नाशिक : (वावी) अत्यावश्यक सेवाचा फलक वाहनावर लावून कांदे आणि टरबूजच्या आडून त्यांनी बेकायदेशीररित्या काहीतरी दडवून ठेवलेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी वावी पोलिसांनी मालवाहतूक गाडी जप्त करत चालकासह एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
असा आहे प्रकार
संगमनेरहून मुंबईकडे टरबूज आणि कांदे घेऊन निघालेला टेम्पो (एमएच 03, सीपी 3682) पाथरे (ता. सिन्नर) येथे आला असता, वावी पोलिसांनी टेम्पोस अडवून तपासणी केली असता, पुढच्या भागात टरबूज आणि कांद्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी संपूर्ण गाडीची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये एका बाजूला एक टन मांस मिळून आले. या मांसची बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी चालक गुलफान अन्सारी (वय 23) आणि सलाम मोहमद शेख (वय 22, रा. कुर्ला) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा > संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.