Ganeshotsav 2023 : स्मार्टसिटी, पोलिस प्रशासन आणि व्यावसायिकांकडून लावलेल्या सीसीटीव्हीमुळे संपूर्ण शहर कॅमेऱ्याच्या नजरेत कैद झाले आहे. यंदा संपूर्ण गणेशोत्सवावर कॅमेऱ्याची नजर असल्याने टवाळखोर आणि उत्सवांमध्ये विघ्न आणणाऱ्यांवर नजर ठेवता येणार आहे.
स्मार्टसिटीअंतर्गत शहरात विविध ठिकाणी विशेषतः मुख्य रस्ते आणि चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. (CCTV eyes on Ganeshotsav 2023 80 cameras operational in main roads intersections nashik)
सध्याची परिस्थिती बघता पोलिस प्रशासनाच्या कॅमेऱ्याची ठिकठिकाणी नजर आहे. इतकेच नाही तर चोरीच्या घटना लक्षात घेता व्यावसायिकांनीही दुकानांसमोर सीसीटीव्ही लावले आहे. यंदा सर्वच सण-उत्सवावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
यामुळे टवाळखोरांवर अंकुश बसणार आहे. सध्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारही सर्वत्र सुरू आहे. अशा समाजकंटकांवरही नजर असणार आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्वरित ताब्यात घेत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दोन ते तीन वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कॅमेरे बसवून नजर ठेवली जात होती.
यंदा मात्र संपूर्ण गणेशोत्सवावरच कॅमेऱ्याचा तिसरा डोळा लक्ष ठेवणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहे.
त्यापैकी ६५० कॅमेरे बसविण्यात आले आहे. शहराचे मुख्य रस्ते आणि चौक येथील ७० ते ८० कॅमेरे कार्यान्वितदेखील झाले आहे. ५ ऑक्टोबरनंतर सर्वच कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ड्रोनची टेहेळणी
स्मार्टसिटी विभागाकडून सीसीटीव्ही बसविलेच आहे. पोलिस प्रशासनास शहरावर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून दिले आहे. गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणुकीवरदेखील ड्रोनचे लक्ष असणार आहे.
"मिरवणूक मार्गासह शहराच्या मुख्य रस्ते, तसेच चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिसांनाही दोन ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शहरातील कॅमेरे बसवण्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ५ ऑक्टोबरनंतर पूर्णत्वास येणार आहे." - अनिल तडकोट, महाव्यवस्थापक, स्मार्टसिटी तांत्रिक विभाग,
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.