NMC News esakal
नाशिक

Nashik : पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी NMCला शासन निधी

विक्रांत मते

नाशिक : घनकचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठा व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असलेल्या नाशिक महापालिकेला या सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने ३९ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीदेखील हवा शुद्धीकरण प्रकल्पासाठी महापालिकेला ४० कोटी रुपयांचा निधी केंद्रीय नगर विकास खात्यामार्फत प्राप्त झाला आहे. (Central Government funding to NMC for water supply solid waste management Nashik Latest Marathi News)

घनकचरा व्यवस्थापनामध्ये नाशिक महापालिका देशात आघाडीवर आहे. राज्यात पहिल्या चार महापालिकांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो. घनकचरा व्यवस्थापन पाठोपाठ पाणीपुरवठ्याची व्यवस्था असूनदेखील त्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नाशिकला निधी देऊ केला आहे. १५ व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यामधील मिलियन प्लस सिटीसाठी २०२१ व २२ या आर्थिक वर्षातील पाणीपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने संपूर्ण देशभरासाठी ७९९ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

या एकूण निधीपैकी ३९ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी नाशिक महापालिकेला मिळणार आहे. निधी प्राप्त करण्यासाठी नाशिक महापालिकेला नगरपरिषद प्रशासनाकडे विनियोग प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, त्यानंतर निधी प्राप्त होईल. सदर निधी खर्च करण्यासाठी अटी व शर्ती आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन अधिक बळकट करण्याबरोबरच प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी निधी खर्च करावा लागणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक कोटी ८७ लाख

१५ व्या वित्त आयोगातून भगूर नगरपरिषद व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डालादेखील निधी प्राप्त होणार आहे. दोन्ही संस्थांना पाणीपुरवठा सुधारणा व घनकचरा व्यवस्थापनासाठी हा निधी राहील. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक कोटी ८७ लाख रुपये तर भगूर नगर परिषदेला ३० लाख ९८ हजार रुपयांचा निधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT