Cervical cancer sakal
नाशिक

Sakal Exclusive : गर्भाशय मुखाचा कर्करोग उच्चाटनासाठी चळवळ! सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनची स्‍थापना

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : कोरोना महामारीच्‍या पहिल्‍या लाटेत जितके मृत्‍यू झाले... दर वर्षी रस्‍ते अपघातात जितके मृत्‍यू होतात... तितकेच मृत्‍यू गर्भाशय ‍मुखाच्‍या कर्करोगामुळे दर वर्षी भारतात होताहेत, हे ऐकले तर कदाचित खोटे वाटेल. परंतु अंगावर काटा आणणारी ही सत्‍य स्‍थिती आहे.

परिस्‍थितीचे गांभीर्य ओळखून नाशिकच्‍या डॉ. रणजित जोशी यांनी सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनची स्‍थापना केली आहे.

जास्‍तीत जास्‍त महिलांच्या चाचण्या व लसीकरणावर भर असलेल्‍या या संस्‍थेच्‍या माध्यमातून गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या उच्चाटनाची चळवळ नाशिकमधून उभी राहत आहे. (Cervical Cancer Prevention Foundation established by Dr Ranjit Joshi nashik news)

सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनच्‍या कार्याची माहिती डॉ. रणजित जोशी यांनी ‘सकाळ’ सोबत साधलेल्‍या संवादातून दिली. ते म्‍हणाले, की जगातील एकूण लोकसंख्येत भारतीय लोकसंख्येचे प्रमाण १४ टक्‍के असून, गर्भाशयाच्‍या मुखाचा कर्करोग (सर्वाईकल कॅन्‍सर) च्‍या जगातील एकूण रुग्‍णांपैकी तब्‍बल ४० टक्‍के रुग्‍ण भारतातील आहेत.

मात्र यासंदर्भात जागरूकतेचा अभाव असल्‍याने अनेकदा उशिराने निदान होते. त्यामुळे आजाराची गुंतागुंत वाढत जाते. काहीवेळा गर्भाशय काढावे लागते. गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया करताना महिला रुग्‍णांचा जीव वाचवावा लागतो.

तर अनेक घटनांमध्ये महिला रुग्‍ण दगावतात. महासत्ता होण्याच्‍या दिशेने निघालेल्‍या भारताला या विळख्यातून बाहेर काढत वेळीच निदान व्‍हावे, या उद्देशाने सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनची स्‍थापना झाली आहे. या चळवळीशी डॉक्‍टरांना जोडून घेताना सर्वसामान्‍यांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे.

‘सीएसआर’चा प्रभावी उपयोग व्‍हावा

अद्यापही भारतात मोठ्या प्रमाणावर सीएसआर निधी अखर्चित राहतो. कंपन्‍यांनी पुढे येऊन लसीकरण, चाचणीसाठी निधी उपलब्‍ध करून दिल्‍यास अल्‍पदरात किंवा निःशुल्क आरोग्‍य सुविधा पुरविणे शक्‍य होईल, असा विश्‍वास डॉ. जोशी यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२१ ठिकाणी चाचणी सुविधा

सर्वसामान्‍यांना चाचणीमुळे आर्थिक बोजा येऊ नये, या उद्देशाने सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनच्‍या माध्यमातून तीन हजारांची प्‍याप स्‍मियर चाचणी अवघ्या बाराशे रुपयांमध्ये उपलब्‍ध करून दिली आहे. नाशिकमध्ये २१ रुग्‍णालयांमध्ये ही चाचणी सुविधा उपलब्‍ध केली असल्‍याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

गर्भाशयाच्‍या मुखाच्‍या कर्करोगाच्‍या ठळक बाबी..

- ९० टक्‍के सरव्‍हायकल कॅन्‍सर ‘एचपीव्‍ही’ या विषाणुमुळे होतो.

- ‘एचपीव्‍ही १६, १८’ या दोन व्‍हेरिएंटमुळे ७० टक्‍के कर्करोग

- विषाणूचे धोकादायक २० पेक्षा अधिक मुख्य व्‍हेरिएंट अस्‍तित्‍वात

- लशीमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो; परंतु नियमित तपासणी गरजेची

- वयाच्‍या ९ ते १४ वर्षांत लसीकरणाचा सर्वाधिक फायदा

- १४ वर्षांखालील मुलींना दोन डोस, पुढील वयोगटात तीन डोस

- लैंगिक संबंध सुरू झाल्‍यापासून ‘एचपीव्‍ही’ विषाणू लागणची सर्वाधिक जोखीम

- महिलांनी दर दोन वर्षांनी प्‍याप स्‍मियर चाचणी करणे गरजेचे

- ४० वर्षांनंतर विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो

- ७ ते १० वर्षे आधी कर्करोगपूर्व बदल होतात.

- वयाच्‍या पंचविशीपासून तपासणी सुरू करावी.

अंगावर काटे आणणारी गर्भाशय मुखाच्‍या कर्करोगाची आकडेवारी..

- दहा हजार महिलांमध्ये २६ जणींना कर्करोगाचे निदान

- दर दहा हजारामागे १५ महिलांचा होतोय मृत्‍यू

- जगभरात दर वर्षी चार लाख ९३ हजार नवीन केसेस. भारतात एक लाख ३२ हजार महिलांमध्ये होते निदान

- जगभरात वार्षिक दोन लाख ७३ हजार मृत्‍यूंपैकी ७४ हजार मृत्‍यू भारतात

- भारतात रोज दोनशे महिला अर्थात, तासाला आठ महिला गमावताय कर्करोगामुळे जीव

- ९७ टक्‍के सरव्‍हाईकल कॅन्‍सर रोखणे शक्‍य

- उशिरा निदानामुळे महिला रुग्‍णांच्‍या जिवाला धोका

नाशिकमध्ये घडले, वाढले डॉ. जोशी...

डॉ. रणजित जोशी यांचे शालेय शिक्षण पेठे विद्यालय, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आरवायके महाविद्यालयातून झाले. पुढे ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंग्लंडला गेले. तेथे दहा वर्षे असताना सुरवातीचे पाच वर्षे स्त्रीरोग शास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच वंध्यत्व निवारण विषयाचे शिक्षण घेतले.

प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या लक्षात आले, की गर्भाशय मुखाचा कर्करोगाबाबत जनजागृती महत्त्वाची आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना या कर्करोगाची गंभीरता लक्षात आली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशन स्थापन केले.

कॉलेज रोड येथे संस्थेचे कार्यालय असून, ते विविध व्यासपीठावरून कर्करोगाच्या बचावात्मक उपाययोजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवत जनजागृती करत आहेत. तसेच वंध्यत्व निवारण क्षेत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली आहे.

"गर्भाशयाच्‍या मुखाचा कर्करोग ही अत्‍यंत गंभीर समस्‍या भारतीय महिलांमध्ये भेडसावत आहे. पूर्वनिदान झाल्‍यास अवघ्या औषधोपचारातून कर्करोगावर मात करता येऊ शकते. तसेच लसीकरणातून जोखीम कमी होऊ शकते. यासंदर्भात व्‍यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्‍ही जनसामान्‍यांपर्यंत पोचत आहोत." -डॉ. रणजित जोशी, चळवळीचे प्रणेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT