kalaram madir nashik esakal
नाशिक

Nashik Kalaram Mandir : श्री काळाराम मंदिरात अवतरले चैतन्य पर्व; पहाटेपासून दर्शनासाठी लोटली गर्दी

अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kalaram Mandir : अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाला. त्याची अनुभूती पंचवटीच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरातही अनुभवण्यास मिळाली.

दर्शनासाठी पहाटे काकड आरतीपासून प्रचंड गर्दी उसळली होती. (Chaitanya Parv incarnated in Shri Kalaram Temple in nashik news)

दुपारी महाआरतीप्रसंगीही भाविकांमधील उत्साह टिपेला पोचला होता. प्रतिष्ठापना सोहळ्याचे स्वागत ठिकठिकाणी सडा रांगोळीने करण्यात आले. याशिवाय नाशिककरांनी गुढ्या तोरणे उभारून श्रीरामरायाचे जोरदार स्वागत केले. अयोध्या येथील सोहळ्याचे श्री काळाराम मंदिराच्या आवारात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

तत्पूर्वी झालेल्या महाआरतीप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिर परिसरातील भक्तिपूर्ण वातावरणाने जणू रामराज्याचीच अनुभूती भाविकांनी घेत होते. तत्पूर्वी मंदिराच्या आवारात सकाळी साडेआठ ते दहादरम्यान दया कुलकर्णी यांनी कीर्तन सेवा सादर केली. तर १० ते १२ पर्यंत श्रीरामाची भजने सादर करण्यात आली.

दरम्यान श्री काळाराम मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई व फुलांच्या हारांनी मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली. पंचवटीसह संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण होते. श्री काळाराम मंदिराबरोबर शहरात दोन ठिकाणी मुठे परिवाराचे श्री गोरेराम मंदिर असून त्यापैकी एक पंचवटीतील कपालेश्‍वर मंदिरालगत आहे.

याशिवाय दुसरे मंदिर गोदाघाटाच्या उजव्या तटावर उंचावर वसले आहे. श्री काळारामासह या दोन्ही ठिकाणीही सकाळपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्रीरामासह लक्ष्मण व सीतामाईच्या मूर्तीस आकर्षक साज चढविण्यात आले होते.

सडा रांगोळीने स्वागत

रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त पंचवटीसह शहरातील अनेक भागातील भाविकांनी सडा रांगोळीने आगमनाचे स्वागत केले. अनेक महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडा रांगोळीने श्रीरामाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी श्रीरामरक्षासह भीमरूपी स्तोत्राचे पठण आयोजित केले होते. याशिवाय शहरासह ग्रामीण भागातही गुढ्या तोरणे उभारून रामलल्लांचे स्वागत करण्यात आले.

विविध मंदिरांत प्रसाद वाटप

श्री रामलल्लांचे स्वागत ठिकठिकाणच्या छोट्या मोठ्या मंदिरात प्रसाद वाटपाने झाले. अनेक मंडळांनी लाडूंचे वाटप केले. भगव्या पताका व झेड्यांनी रामरायाचे स्वागत केले. याशिवाय काही मंडळांनी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही आघाडीवर होता. याशिवाय विविध मंडळातर्फेही प्रसाद वाटपासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत... अमित ठाकरेंनी विषयच संपवला! नेमकं काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद आणि वोट जिहाद करण्याची योजना आखलीये - किरीट सोमय्या

IND A vs AFG A : भारत-अफगाणिस्तान सामन्यात थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, पाहा नेमकं काय घडलं

Kagal Election : 'मुश्रीफांनी बुद्ध विहारांमध्ये 50 टक्के मार्जिन घेतले'; रोहित पवारांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप

Madha Assembly Election 2024: माढा मतदारसंघात उमेदवार निश्चित; नेत्यांपुढे निवडीचा पेच, युतीतील कोणत्या पक्षाला जाणार जागा

SCROLL FOR NEXT