chamber are not clean properly nashik news esakal
नाशिक

Nashik News : कामाच्या नावाखाली पाट्या; नाले, चेंबरमध्ये ‘हातसफाई?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीला धरून विभागीय कार्यालयांकडून कायमस्वरूपी उपाय सोडून धोकादायक घरांना फक्त नोटिसा बजावल्या जातात.

त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारींची स्वच्छता, चेंबरची साफसफाई, मॅनहोल व पाइपलाइन दुरुस्ती हीदेखील नावालाच होत असल्याचे नाले व चेंबरच्या साफसफाई वरून दिसून येत असून यात हात की सफाई तर नाही ना? असा संशय बळावण्यास संधी आहे. (chamber are not clean properly nashik news)

शहराचा विस्तार वाढतं असताना मलजल, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळेदेखील तेवढ्याच प्रमाणात विस्तारले आहे. त्याचबरोबर नैसर्गिक नाल्यांसह महापालिकेनेदेखील पावसाळी तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची निर्मिती केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, चेंबरची दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती किंवा साफसफाई करणे आवश्‍यक असते.

जेणेकरून पावसाचे पाणी तुंबून आर्थिक नुकसान होणार नाही. अद्याप पाऊस सुरू झाला नसला तरी ७ जूनच्या आत कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीचा विचार करता पन्नास टक्केदेखील काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे. शहरात २१०० किलोमीटरचे नाले असताना आतापर्यंत फक्त ५२२ किलोमीटरचेच काम झाले आहे.

चाळीस हजारहून अधिक चेंबर असताना अवघ्या दहा हजार चेंबरची सफाई करण्यात आली आहे. कामे पूर्ण नसताना मात्र अकाऊण्ट विभागात देयके दाखल झाली आहे. मलनिस्सारण विभागाने सहा विभागात प्रत्येकी तीस लाखांच्या इस्टिमेटच कामे दिले होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कामांची स्थिती बघता फक्त बिले काढण्यासाठीच सफाई झाल्याचे दिसून येत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होऊन पाणी तुंबल्यास व पुढे त्यातून आर्थिक नुकसान झाल्यास महापालिका जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

"मलनिस्सारण विभागाच्या माध्यमातून फक्त सफाईचे कामे होतात, दुरुस्तीचे काम बांधकाम विभागामार्फत केले जाते. आवश्‍यक त्या ठिकाणी सफाई झाली आहे." - उदय धर्माधिकारी, अधिक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका.

असा आहे महापालिकेचा दावा

कामाचे नाव पूर्व नाशिकरोड पंचवटी पश्चिम सातपूर सिडको एकूण

मॅनहोल दुरुस्ती १०८ १७२ ३७ ७१ ३० ११२ ५३०

चेंबर सफाई-दुरुस्ती ३४७ ३२३७ ७८२ ४२२ ३३५५ १८६७ १०,०१०

पाइपलाइन सफाई ५० ३७ ८४ ११४ १४० ९७ ५२२

पाइपलाइन दुरुस्ती १२० ४५ ०० ३५ ०० ०० २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT