Dancing horses at Nandoorvaidya climbing the steps of the fort. Neighbors Kailas Karpe and villagers. esakal
नाशिक

Champa Shashthi Festival: नांदूरवैद्यचा अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे यांचे नृत्य करणारे अश्व अनेक वर्षांपासून चंपाषष्ठीला जेजुरीची वारी करीत आहेत. यंदाचे १२ वे वर्ष होते. (Champashashthi Festival tradition of Jejuri Vari cultivating Nandoorvaidyas horse nashik)

कैलास कर्पे दरवर्षी न चुकता आपल्या अश्वाला जेजुरी गडावर घेऊन जातात. गडाच्या ३८५ पायऱ्या अश्व काही तासातच चढून खंडोबाला दोन पाय जमिनीवर ठेऊन खंडोबा चरणी लोटांगण घालतो.

गडाच्या पायरीला ९ लाख दगड वापरल्यामुळे ९ लाख पायऱ्या असा उल्लेख आढळतो. हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. नंतर गडावर महाराष्ट्रातून आलेल्या अश्वांच्या नृत्याची जुगलबंदी होते.

ही डोळ्याची पारणे फेडणारे नृत्यविष्कार पाहून उपस्थित भाविक आनंदाने भारावून जातात. खंडोबाला नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांतर्फे अभिषेक करण्यात येतो. अश्वाबरोबर संपूर्ण मंदिराला वाजत गाजत फेरी मारली जाते.

खंडोबाला गडावरच तयार केलेला नैवैद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप केले जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा अश्वप्रेमी असलेले कर्पे कुटुंब जपत आहे. या वारीत दरवर्षी ग्रामस्थांची बहुसंख्येने वाढ होत आहे.

खंडोबाची सामुहिक आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जेजुरी वारीत रामदास गायकवाड,शरद ढेरिंगे,कैलास कर्पे, वैभव कातोरे,राहुल कर्पे,शिवाजी यंदे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

"गेल्या १२ वर्षांपासून सलग जेजुरी गडावर नृत्य करणाऱ्या अश्वाला घेऊन जाऊन खंडोबांचे दर्शन करणे आम्हाला आनंद देणारे ठरते."- कैलास कर्पे, नांदूरवैद्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Shreyas Talpade : "मी अक्षयचा आयुष्यभर ऋणी " ; हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत

SCROLL FOR NEXT