A dancing horse from Nandoorvaidya climbing the steps of Jejuri Fort. Neighbors Kailas Karpe, Shivaji Yande and villagers esaka
नाशिक

Champa Shashti : नांदूरवैद्य येथील अश्व जोपासतोय 11 वर्षांपासून जेजुरी वारीची परंपरा!

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे प्रसिद्ध आहे. चंपाषष्ठीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी, तसेच नवसपूर्ती करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत नृत्य सादर करणारे अश्व या ठिकाणी भाविक घेऊन येत असतात. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे यांचे देखील हे नृत्य करणारे अश्व अनेक वर्षांपासून चंपाषष्ठीला जेजुरीची वारी करीत आहेत. (Champa Shashti tradition of Jejuri Vari by horse been growing for 11 years in Nandurvaidya Nashik News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत आलेल्या नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे दर वर्षी न चुकता आपल्या या अश्वाला जेजुरी गडावर घेऊन येत असतात. गडाला असणाऱ्या ३८५ पायऱ्या हा अश्व काही तासांतच चढून खंडोबाला दोन पाय जमिनीवर ठेवून खंडोबाचरणी लोटांगण घालतो. हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. गडावर महाराष्ट्रातून आलेल्या अश्वांच्या नृत्याची जुगलबंदी होते. ही डोळ्यांची पारणे फेडणारे नृत्याविष्कार पाहून उपस्थित भाविक आनंदाने भारावून जातात.

या ठिकाणी खंडोबाला नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात येतो. अश्वाबरोबर संपूर्ण मंदिराला वाजतगाजत फेरी मारली जाते. यानंतर खंडोबाला गडावरच तयार करण्यात आलेला नैवेद्य दाखविण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप केले जाते. या जेजुरी वारीत रामदास गायकवाड, शरद ढेरिंगे, कैलास कर्पे, वैभव कातोरे, राहुल, भरत कर्पे, शिवाजी यंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

"गेल्या अकरा वर्षांपासून सलग जेजुरी गडावर अश्वाला घेऊन जात असून, पहिल्यापासून आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य पशूप्रेमी आहेत. यामुळे खंडोबाचे वाहन असलेले अश्व जेजुरी गडावर घेऊन जाऊन अश्वासोबत दर्शन करणे आम्हाला आनंद देणारे ठरते."
- कैलास कर्पे, अश्वमालक नांदुरवैद्य (ता. इगतपुरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT