Chance of unseasonal rain in district nashik news esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : जिल्ह्यात पावसाची शक्यता; द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडका जाणवत असतानाच हवामानात बदल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडका जाणवत असतानाच हवामानात बदल झाला आहे. शुक्रवारपासून अनेक भागात ढगाळ वातावरण दिसून आले.

शेजारील अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Chance of unseasonal rain in district nashik news)

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवसाचा अंदाज लक्षात घेत ७ ते ९ जानेवारीदरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ-विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या कृषी हवामान प्रक्षेत्र विभागाकडून देण्यात आली आहे.

शनिवारी (ता.६) ते १० जानेवारी दरम्यान प्राप्त अंदाजानुसार आकाश पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान २९-३० अंश सेल्सिअस सेंटीमीटर व किमान तापमान १३-१४ अंश सेल्सिअस तसेच वाऱ्याचा वेग ७-१३ किलोमीटर तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळे ७ ते ९ जानेवारी दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. यात पावसाचा अंदाज वर्तविल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. कापणी व मळणी केलेले पिकांना प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर ११ जानेवारी, अमावास्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता आहे, हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

MP Priyanka Chaturvedi : त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे... त्यांना माहितीये ते हरणार आहेत..

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

Sharad Pawar: आमच्या शेतकऱ्याला मिळते ती थकबाकीदाराची पदवी; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Virat Kohli ने केली नव्या टीमची घोषणा, म्हणाला हा माझा नवा अध्याय...

SCROLL FOR NEXT