NAMCO Bank Election esakal
नाशिक

NAMCO Bank Election: बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली! 21 जागांसाठी विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरची दिवशी शुक्रवारी (ता.१) इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती. दिवसभरात ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

त्यामुळे आतापर्यंत २१ जागांसाठी १७८ उमेदवारांनी तब्बल २७२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वसाधारण २१७, महिला राखीव गटातून ३९ तर, अनुसूचित जाती जमाती गटातून १६ अर्जांचा यात समावेश आहे.

दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली असून निवडणूक अटळ आहे. (Chances of unopposed election gone record 272 nominations filed for 21 seats NAMCO Bank Election nashik)

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी शुक्रवारी ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

यात प्रामुख्याने जयदत्त होळकर, ललित नहार, शंकरराव वाघ, विजय बोरा, कमलेश बोडके, कैलास मुदलियार, गणेश गिते, संतोषकुमार मंडलेचा, हेमंत आमले, शरद कुटे, शिवनाथ कडभाने, छबू नागरे, वेदिका जयदत्त होळकर, पद्मा बूब, वैशाली जैन आदींचा समावेश आहे.

विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरशीची होत असल्याने या निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर कोणकोणते पॅनल उभे ठाकणार, याबाबत उत्सुकता होती. निवडणूक बिनविरोध व्हावी असाही काही सभासदांचा आग्रह होता.

मात्र, गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने पुन्हा कंबर कसल्याने, सोहनलाल भंडारी, वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने यांच्या प्रगती पॅनलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अर्ज विक्री व स्वीकृतीनुसार १७८ सभासदांनी २७२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून १३८ सभासदांनी २१७ उमेदवारी अर्ज, महिला राखीव मतदार संघातून ३० सभासदांनी ३९ उमेदवारी अर्ज तर अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातून १० सभासदांनी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता बँकेच्या केंद्र कार्यालयात करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.५) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर अर्ज माघारीची मुदत ६ ते ११ डिसेंबर असणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT