Sagar Gadakh teaching children to swim in the Godavari river behind the Khanderao temple. esakal
नाशिक

Nashik News : चला शिकू या पोहायला! चांदोरीत सागर गडाख नाममात्र शुल्कात देतात धडे

सागर आहेर

Nashik News : पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, असे म्हटले जाते. पण पाण्यात उतरण्यासाठी धाडस लागते आणि हे धाडस निर्माण करण्याचे काम कुणालातरी करावे लागते.

चांदोरीतील एक अवलिया सागर गडाख यांनी गेल्या दोन वर्षांपासून मुले, तरुण, महिला यांना नाममात्र दरात पोहायला शिकविण्याचे व्रत अंगीकारले आहे. त्यांच्या पुढाकाराने पाच वर्षात सुमारे ७०० हून अधिक जण पोहण्यात तरबेज झाले आहेत. (Chandor Sagar Gadakh offers lessons for nominal fee Nashik News)

शहरात जलतरण तलावात आणि मोबदला घेऊन पोहायला शिकवणारे प्रशिक्षक असले तरी सर्वांनाच वेळ आणि पैसा खर्च करणे शक्य होत नाही. जलतरण केंद्राकडे विशेषतः मुलामुलींचे प्रमाण अधिक असते.

मात्र चांदोरी येथे खंडेराव मंदिरामागे गोदावरी नदीत पोहायला शिकणाऱ्यांची बात वेगळी आहे. याठिकाणी पाच वर्षांच्या मुलांपासून ५० वर्षांपर्यंतचे नागरिक पोहायला शिकण्यासाठी येतात. नाममात्र फी, शिकण्यासाठी स्वतःचे साहित्य नाही की दैनंदिन कामकाजात व्यत्यय नाही. सकाळी सहा ते आठ यावेळेत पोहण्याची इच्छा असलेल्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेते.

विशेष म्हणजे सागर गडाख यांनी पालकांमध्ये जागृती करून ६० हून अधिक मुलींनाही पोहायला शिकवले आहे. पोहायला मिळत असल्याने अलिकडे महिलाही सहभागी होत आहेत. रोज सकाळी सहाला सागर गडाख गोदावरी नदीवर हजर असतात.

दोन तास नदी काठावर थांबून किंवा पाण्यात उतरून ते मुलांना पोहण्याची कला शिकवतात. पोहता येत असेल तर त्याचे लाभ कसे होतात, हे त्यांच्या तोंडून ऐकताना न पोहणारी व्यक्तीही पाण्यात प्रवृत्त न झाली तरच नवल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अशी सुचली ही कल्पना

पाच वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काम करताना अनेक हृदयद्रावक प्रसंगांना सामोरे जावे लागले. तलावात, शेततळ्यात, नदीत बुडून मुलांचा मृत्यू होत असल्याच्या घटना ऐकायला मिळत होत्या.

सहलीवरही अशा घटना घडत असल्याने अस्वस्थ वाटत होते. प्रत्येकाला पोहायला येणे आवश्यक असताना यासाठी शक्य होईल तितके प्रयत्न करण्याचे सागर गडाख यांनी ठरवले.

आठ दिवसात होते शक्य

सुरवातीला दहा मुलांना शिकवायला सुरवात केली. प्रशिक्षण असल्याने हळूहळू ही संख्या वाढत गेली. आतातर शंभरहून अधिक मुले येतात. सकाळच्या प्रसन्न वातावरणात उत्साहदेखील मोठा असतो.

नवशिक्या मुलांना हातपाय कसे हलवायचे याचे प्राथमिक मार्गदर्शन देऊन पोहायला सांगितले जाते. चार दिवसात पोहणारा व्यवस्थित हातपाय हलवू लागला, की पाठीवर लाईफ जॅकेट दिले जाते. एक मुलगा, मुलगी किंवा तरुण आठ दिवसांनंतर कसलीही मदत न घेता पोहू शकतो, असे सागर गडाख सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT