Muslim cleric Mufti Roshan welcoming Shri Swami Samarth Gurupeeth General Manager Chandrakant More and youth present in second photograph esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : प्रेम हाच खरा धर्म... हीच ‘गुरुमाउलीं’ची शिकवण : चंद्रकांतदादा मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : महात्मा गांधी, साने गुरुजी यांसारख्या राष्ट्र व युगपुरुषांनी, ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगून सर्व भारतीयांनाच नव्हे, तर जगाला प्रेमाचं, अहिंसेचं महत्त्व समजावून सांगितलं आणि माणुसकी हाच खरा धर्म असल्याचं सातत्यानं सांगितलं.

हाच वारसा आज गुरुमाउली अण्णासाहेब पुढे घेऊन जात असून, ‘संस्कार केल्यास संस्कृती टिकेल, संस्कृती टिकल्यास धर्म टिकेल आणि धर्म टिकल्यास राष्ट्र टिकेल,’ असा संदेश सातत्याने देत असून, माणुसकीची संस्कृती आणि माणुसकीचा धर्म शिकविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. (Chandrakant More guidance Love is true religion This is teaching of Guru Mauli nashik news)

श्री स्वामी समर्थ चळवळ जगभर वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील असून, आज जाती-पाती, धर्माच्या पलीकडे जाऊन ते प्रेमाचा, माणुसकीचा धर्म रुजविण्याचं काम करीत असल्याने सर्वधर्मीय नागरिक विशेषतः मुस्लिम भाविक मोठ्या प्रमाणात श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाकडे आकर्षित होत असून, गुरुमाउलींनी दाखविलेल्या मार्गांवरून ते मार्गक्रमण करीत असल्याचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादा मोरे हे गुरुमाउलींच्या आदेशानुसार विदर्भ दौऱ्यावर गेले असता भारतातील सर्वधर्म समभावाचं दर्शन झाल्याने ते भारावून गेले. याबाबत सांगताना त्यांनी भारतीय राष्ट्रीय एकात्मकतेचा गौरव करताना सांगितले, की विदर्भातील मूर्तिजापूर येथे मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती रोशन यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा प्रतिनिधी म्हणून माझे स्वागत केले.

हा माझा वैयक्तिक सन्मान नव्हता; तर भारतीय सर्वधर्म समभावाचा व गुरुमाउली जगभर करीत असलेल्या कार्याचा सन्मान होता. धर्मगुरू एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांच्या तेथे एकत्रित झालेल्या जवळपास दीड हजार मुस्लिम युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सर्व तरुणांना राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, सामुदायिक सहजीवन, बाल, युवा संस्कारांची गरज अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले असता युवकांनी समाधान व्यक्त केले आणि आम्ही सर्व प्रखर राष्ट्रप्रेमी आहोत, आपण वारंवार राष्ट्रहिताच्या गोष्टी सांगण्यासाठी या, अशी विनंती केली. या वेळी दीड हजार मुस्लिम युवक उपस्थित होते.

चंद्रकांतदादा म्हणाले, की गुरुमाउलींकडे येताना मुस्लिम भाविकांना वेगळेपणा जाणवत नाही. धार्मिक तेढ कुठेच निर्माण न होता भारतभर प्रेम, एकमेकांविषयी जिव्हाळा राहावा, असंच या बांधवांना वाटते. जेव्हा देशावर मानवनिर्मित, नैसर्गिक संकटे येतात, तेव्हा हे सर्व बांधव आपल्या अल्लाहला विनंती करतात, प्रार्थना करतात.

याआधी विदर्भात सर्वधर्मीय मेळावा झाला, त्यात गुरुमाउली प्रमुख अतिथी होते. थोडक्यात मुस्लिम बंधू-भगिनी आता मोठ्या प्रमाणात सेवामार्गाकडे वळत असल्याची समाधानाची बाब आहे. देशभर होणाऱ्या सेवामार्गाचे विविध उपक्रम, कार्यक्रम, मेळाव्यात आपले हे मुस्लिम बांधव सर्व कामात अग्रेसर असतात, असेही चंद्रकांतदादा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT