NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik: रस्ते वाड्यांच्या जातिवाचक नावात बदल, मात्र फलक लावण्यास विरोध! महापालिका प्रशासनाकडून विभागीय समितीला अहवाल

राज्याच्या समाजकल्याण विभागाने सामाजिक समरसतेसाठी शहरातील वस्त्या, रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याच्या समाजकल्याण विभागाने सामाजिक समरसतेसाठी शहरातील वस्त्या, रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिका हद्दीत ७८ वस्त्या व तीन रस्त्यांची जातिवाचक नावे बदलली.

शासन पातळीवर सामाजिक समरसतेत रूपांतर झाले असले तरी नागरिकांच्या मनात अद्यापही पारंपरिक पद्धत घर करून बसली आहे.

जातिवाचक नावाऐवजी नवीन सुचविलेल्या नावांचा फलक लावण्यास नागरिकांकडून विरोध होत असल्याची बाब महापालिका प्रशासनाने विभागीय समितीसमोर मांडली. (Change in caste names of road wada but opposition to putting up boards Report from NMC to Departmental Committee Nashik)

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जातिवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलण्यासंदर्भात झालेल्या कारवाईचा आढावा घेतला.

या वेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी ही माहिती दिली. ७८ जातिवाचक वस्त्या, तीन रस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. महासभेच्या मंजुरीनंतर कागदोपत्री नावे बदलण्यात आली.

परंतु दुसरीकडे जातिवाचक नावे बदलण्यास विरोध झाल्याची माहिती सादर करण्यात आली. नावे बदलण्यास अडचण येत असल्याचा अहवाल करण्यात आला. नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या.

पूर्वीची नावे व बदललेली नावे अशी (कंसात बदललेले नाव)

- पूर्व विभाग- जुनी तांबट गल्ली (ओंकार लेन), कुंभारवाडा (भूमीनगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली ( रामशेज गल्ली), मातंगवाडा (स्वाभिमाननगर), राजवाडा (प्रगतीनगर), कोकणीपुरा (जनतानगर), कोळीवाडा (कौशल्यनगर ), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरूड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयूनगर), मुलतानपुरा (शहीदनगर), साळी गल्ली (शांतिनगर), काझीपुरा (इन्कलाबनगर), वैदुवाडी (अहिंसानगर), आदिवासी वाडा (क्रांतीनगर), माळी गल्ली (उपासनानगर), रामोशी वाडा (सहकारनगर).

पश्चिम विभाग- नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंगवाडा (मुक्तीवाडा) ख्रिश्चनवाडी (जयपूर नगरी), कुंभारवाडा (धरतीनगर), साळीवाडा (स्नेहनगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन) काजीगडी (गोदागडी).

पंचवटी विभाग- वैदुवाडी (पैनगंगानगर), मांगवाडा (नर्मदानगर), धनगर गल्ली (जयहिंदनगर), जोशीवाडा (रायगडनगर), तांबोळीनगर (वेदश्री नगर), भराडवाडी (रायरेश्वरनगर), वडारवाडी (रामशेजनगर), मोठा राजवाडा (सिंधूनगर), नाथ गल्ली (आनंदीनगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरी नगरी), भोईवाडा (जनस्थाननगर), कुंभार गल्ली (कलाकृतीनगर), चांभार गल्ली (त्रिकटकनगर), कोळीवाडा (हुतात्मानगर).

नाशिक रोड विभाग- बौद्धवाडा (समतानगर), गोसावीनगर (आराधनानगर), गवळीवाडा (राधानगरी), बौद्धनगर (नालंदानगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावीवाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्षनगर), महावीरनगर (रायगडनगर), जैन कॉलनी (सम्यकनगर), बौद्धवाडा (गोकुळधाम), मांगवाडा (गोवर्धननगर), धनगर गल्ली ( टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगतीनगर), भोई गल्ली (विकासनगर), वाल्मीकनगर (निर्माणनगर), कुंभार गल्ली (कुशलनगर), चांभारवाडा (क्रांतीनगर), लोहार गल्ली (कामगारनगर).

सिडको विभाग- हाजी नगर (खुशबूनगर), झिनतनगर ( महेकनगर), हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवननगर), कोळीवाडा (श्रमिकनगर), कोळीवाडा (कर्मयोगीनगर), विश्वकर्मा (आविष्कारनगर).

सातपूर विभाग- कोळीवाडा (गोदावरीनगर), जोशीवाडा (रायगड नगर), कोळीवाडा (सागरवाडा), कोळीवाडा (अंजनेरीनगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT