Nashik Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद बँकेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून २ जुलै रोजी २१ जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी सकाळी ८ ते ४ या वेळ निश्चित करण्यात आला होता.
मात्र, या मतदान वेळात बदल करण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. त्यानुसार निवडणूक अधिकारी गौतम बलसाणे यांनी मतदान वेळात बदल केला असून, बॅंकेसाठी आता सभासदांना सकाळी ८ ते ५ वेळात मतदान करता येणार आहे. (Change in voting time in district government and council bank elections 1 hour bonus nashk news)
शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेच्या २१ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. यंदा २१ जागांसाठी एकूण १२२ अर्ज प्राप्त झाले होते. माघारीच्या दिवशी एकूण ८० उमेदवारांनी माघार घेतली.
त्यामुळे २१ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात राहिले आहे. विशेष म्हणजे एकही अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरलेला नाही. सत्ताधारी समता व विरोधी सहकार पॅनलने उमेदवार जाहीर करत प्रचारास सुरवात केली आहे.
तालुका दौरे करत, उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेचा कालावधी मतदानासाठी होता. मात्र, सभासदांची संख्या मोठी असून जिल्ह्यासह जिल्हाबाहेर देखील सभासद असल्याने त्यांना येण्यासाठी वेळ लागेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सेवानिवृत्त सभासदांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदानाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी उमेदवारांच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारांनी केलेल्या वेळ वाढविण्याच्या मागणी प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांकडे सादर केला होता.
सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मतदानासाठी एक तासाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान सभासदांना मतदान करता येणार आहे. झालेल्या बदलाची उमेदवारांसह सभासदांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.