Nashik Ganeshotsav News : भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गणेशोत्सव काळात सायंकाळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.
बदल केलेल्या मार्गांवर पर्यायी मार्ग सुचविले असून, वाहनचालक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. मंगळवार (ता. १९) पासून हे बदल सायंकाळी 6 ते रात्री बारापर्यंत असतील.
तसेच या मार्गांवरून पोलिस सेवेतील वाहनांना, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश राहणार आहे. त्याचप्रमाणे ज्या मार्गावरून वाहतूक बदल केले आहे, तसेच स्थानिक रहिवाशांना या मार्गातील वाहतूक बदल लागू राहणार नाही, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. (Changes in traffic routes in city during Ganesh Utsav nashik news)
वाहतुकीस प्रवेश बंद मार्ग असे
- सारडा सर्कल- खडकाळी सिग्नल- शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग
- खडकाळी सिग्नलकडून दीप सन्स कॉर्नर- नेहरू उद्यानकडून गाडगे महाराज पुतळ्यामार्गे मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा मार्ग
- त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नर दुतर्फा मार्ग
- गाडगे महाराज पुतळा-धुमाळ पॉइंट- मंगेश मिठाई कॉर्नर
- सीबीएसहून शालिमार व नेहरू उद्यानाकडे जाणारा मार्ग
- मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल- धुमाळ पॉइंट - दहिपूल दुतर्फा मार्ग
- प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा मार्ग
- अशोक स्तंभ - रविवार कारंजा - मालेगाव स्टँड दुतर्फा मार्ग
- मालेगाव स्टॅन्ड - रविवार कारंजा - शालिमार दुतर्फा मार्ग
- मोडक सिग्नल - खडकाळी सिग्नल मार्गे कालिदास कलामंदिर मार्गे शालिमारकडे जाणारी दुतर्फा वाहतूक बंद
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पर्यायी वाहतूक मार्ग असे
- सारडा सर्कल - गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोक स्तंभ - रामवाडी मार्गे - मालेगाव स्टॅन्ड - मखमलाबाद नाका - पेठनाका - दिंडोरी नाका मार्गे इतरत्र जातील.
- मालेगाव स्टॅन्डपर्यंत येणारी वाहतूक मखमलाबाद नाका - रामवाडी - जुना गंगापूर नाका मार्गे इतरत्र जातील.
वाहतूक मार्गात बदल व पर्यायी मार्ग
- मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याचे दुकान या मार्गावरील दुतर्फा वाहतूक सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नलमार्गे जाऊ शकेल.
- सीबीएस बाजूकडून गायकवाड क्लास, कान्हेरवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपड्याचे दुकानाकडे व सुमंगल कापड्याकडून कालिदास मार्ग व किटकॅटकडून सीबीएस बाजूकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजूने सर्व वाहनांसाठी "प्रवेश बंद" राहील.
- पंचवटी विभागातील सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर असा मार्ग दुतर्फा वाहतुकीस बंद राहणार आहे.
- पंचवटीतील मालवीय चौक ते गजानन चौक, नाग चौक, शिवाजी चौक व शिवाजी चौक ते मालविय चौक असा दुतर्फा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल
गणेशोत्सवात काही मंडळांतर्फे व नागरिकांकडून पाचव्या व सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्या वेळी विसर्जन स्थळांवर गर्दी होत असल्याने तेथेही वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
त्यानुसार निमाणी बसस्थानकावरून पंचवटी कारंजा मालेगाव स्टॅन्ड रविवार कारंजा मार्गावर आणि सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस, सिटीलिंक बस व जड वाहनांना २३ व २५ सप्टेंबरला दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे.
यावर पर्यायी मार्ग म्हणून काटया मारुती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवारपुल, द्वारका सर्कल मार्गाने नाशिक, नाशिक रोड, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी जातील. तसेच सीबीएस वरून निघणारी वाहतूक अशोकस्तंभ, रामवाडी पुल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका, या मार्गावरुन निमाणी स्टॅन्डकडे जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.