Archive photo of Talwade storage pond esakal
नाशिक

Nashik News : चणकापूरच्या आवर्तनाने शेतीला दिलासा! लहान मोठ्या 52 पाणीपुरवठा योजनांना फायदा

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. आवर्तनामुळे मालेगावसह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदा झाला. तसेच लाभ क्षेत्रातील शेतीला दिलासा मिळाला आहे.

संयुक्त आवर्तनाने रब्बी पिकांसह उन्हाळी कांद्याला फायदा होईल. १९ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे साठवण तलाव भरून घेतला जात आहे. (Chankapur revolution brings relief to agriculture Small large 52 water supply schemes benefit Nashik News)

गेल्यावर्षी कसमादेत पुरेसा पाऊस झाला नाही. मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. कसमादेतील इतर तालुक्यात देखील पाणी टंचाईची परिस्थिती आहे. पाऊस कमी असला तरी माणिकपूंज व नाग्यासाक्या वगळता सर्व धरणे भरली होती.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणात देखील ५५ टक्क्यावर साठा झाला होता. चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद ही चार प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाल्याने किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला.

त्याचबरोबर धरणांमधून आवर्तनाची मागणी वाढली. हरणबारीतून तीन आवर्तने सिंचनासाठी घेण्यात येणार आहेत. यातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

पाणीपुरवठा योजनांवर ताण

चणकापूर धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. अपुऱ्या पावसामुळे तसेच परतीचा पाऊस देखील कमी प्रमाणात झाल्याने चणकापूरवर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला होता.

अनेक गावांमध्ये आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा योजनांनी दिलेला ताण व शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी पाहता १९ जानेवारीला चणकापूरमधुन पहिले संयुक्त आवर्तन सोडण्यात आले.

यातून विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरुन घेतले जात आहेत. दाभाडीसह बारागाव योजनांसाठी वरदान ठरलेल्या शेवाळी नाला तलाव भरून घेण्यात आला आहे. आवर्तनाच्या अंतिम टप्प्यात तलाव भरून घेतला जात आहे. दोन दिवसात तलाव पूर्ण भरेल.

नदीपात्रात सोडले जाणार?

शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन असल्याने साधारणत: ७०० ते ७५० दशलक्ष घनफूट पाणी गिरणा नदीपात्राद्वारे सोडले जाण्याची शक्यता आहे. गिरणा डाव्या कालव्यातील लाभ क्षेत्रातील शेतीला आवर्तनाचे पाणी मिळत आहे.

यामुळे उन्हाळी कांदा व रब्बी पिकांना दिलासा मिळाला. विहिरींचे पाणी कमी होत असतानाच आवर्तन मिळाल्याने अनेक ठिकाणी पिकांना त्याचा फायदा होईल. आवर्तनामुळे विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरून घेण्यात आले असून आगामी दीड महिना पाणी पुरवावे लागणार आहे. चणकापूरमधून पुढील आवर्तन एप्रिलच्या सुरवातीला सोडले जाऊ शकेल.

कसमादेतील धरणातील पाण्याची स्थिती

धरणाचे नाव साठवण क्षमता आजचा साठा टक्केवारी (दशलक्ष घनफूटमध्ये)

चणकापूर २४२७ १५८० ६५.१०

हरणबारी ११६६ ७९७ ६८.३५

केळझर ५७२ २८३ ४९.४८

नाग्यासाक्या ३९७ ०० ००

गिरणा १८५०० ७६४० ४१.३०

पुनंद १३०६ १०९२ ८३.६१

माणिकपुंज ३३५ ८० २३.८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT