Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Nashik: श्री स्वामी सेवा मार्गातर्फे दत्तजयंतीनिमित्त अखंड नाम जप; 20 ते 27 डिसेंबरदरम्यान केंद्रामध्ये विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे २० ते २७ डिसेंबरदरम्यान श्रीदत्त जयंतीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह संपूर्ण जगभरातील सेवा केंद्रांमध्ये साजरा केला जाणार आहे, अशी माहिती सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दिली.

श्री क्षेत्र दिंडोरी येथील प्रधान सेवा केंद्रामध्ये रविवारी (ता. १७) साप्ताहिक प्रश्नोत्तरे- मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. (Chanting Akhand Naam on Datta Jayanti by Sri Swami Seva Marga Various programs at center from 20th to 27th December Nashik)

या वेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमपूज्य गुरुमाऊलींनी बालसंस्कार, प्रश्नोत्तरे, विवाह मंडळ, आरोग्य, वास्तुशास्त्र, कायदेशीर सल्लागार, प्रशासकीय कामकाज, दुर्गसंवर्धन, पर्यावरण, देश-विदेश अभियान आदी विभागांवर मार्गदर्शन केले.

अत्यंत प्रासादिक आणि रसाळ वाणीतून संबोधित करताना गुरुमाऊली यांनी सांगितले, की गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नृसिंहवाडी, अबू पर्वत, गिरनार या सर्वच ठिकाणी दत्त जयंती साजरी होते.

श्री स्वामी सेवा मार्गाच्या सर्व दत्तधामांमध्येही दत्त जयंतीनिमित्त सेवेकऱ्याना सामुदायिक गुरुचरित्र वाचण्याची अपूर्व संधी मिळणार आहे.

ज्या सेवेकऱ्यांना गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी, गुरुपीठ या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे, त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे त्यांनी सूचित केले.

सप्ताह काळामध्ये पादत्राणे, प्रहरे, प्रसादवाटप अशा विविध असामान्य सेवांमध्ये भाविकांनी सहभागी होऊन आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे असे ते म्हणाले.

अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची रूपरेषा स्पष्ट करताना गुरुमाऊली मोरे म्हणाले की, १९ डिसेंबरला ग्रामदेवतांचा मानसन्मान होईल. २० ला सप्ताहाला प्रत्यक्ष प्रारंभ होऊन देवतांची स्थापना, अग्नी स्थापना आणि हवन होईल.

२१ ला नित्य स्वाहाकारासह गणेश आणि मनोबोध याग होईल. २२ ला सकाळ सत्रात गीताई याग आणि एकादशीनिमित्त दुपारनंतर संक्षिप्त भागवत ग्रंथाचे सामुदायिक पाठ घेतले जातील. २३ ला स्वामी याग, २४ ला चंडीयाग, २५ ला रुद्र याग संपन्न होईल.

२६ डिसेंबरला दत्त जयंतीची आरती नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता न होता दुपारी बारा वाजून ३९ मिनिटांनी होईल आणि २७ ला श्री सत्यदत्त पूजन आणि देवता विसर्जन होऊन अखंड नाम जप यज्ञाची श्रद्धापूर्वक वातावरणात सांगता होईल.

अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे आपले प्रारब्ध शुद्ध करण्याची एक नामी संधी असून या काळात विविध सेवांचे प्रशिक्षणही घेता येते. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकऱ्‍यांनी संपूर्ण जगभरातील सेवाकेंद्रांमध्ये होणाऱ्या सप्ताहात सहभागी व्हावे असे त्यांनी नमूद केले.

डिसेंबरचा मासिक महासत्संग या वेळी सप्ताहामुळे चौथ्या शनिवारी होण्याऐवजी म्हणजे २३ डिसेंबरऐवजी ३० डिसेंबरला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी गुरुपुत्र आ. आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Latest Marathi News Updates live : जाती गणगणेचा खरा अर्थ न्याय आहे - राहुल गांधी

Manoj Jarange : ..अन् उमेदवारांचा जीव पडला भांड्यात; मराठा समाजाच्या अर्ज माघारीने मतविभागणीचा टळला धोका

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

SCROLL FOR NEXT