Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने, प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेत हा पदभार विभागातील वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे सोपविला आहे. (charge of Secondary Education Officer of Zp to controversial Deputy Education Officer Deore nashik news)
शासन आदेशाप्रमाणे, समकक्ष अधिकाऱ्याकडे हा पदभार देणे आवश्यक असताना त्यांना डावलून तो विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पाटील वैद्यकीय रजेवर गेले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर प्रशासनाने याबाबत ‘एफआरआय’च्या प्रतीसह कागदपत्रांची संबंधित विभागाकडून मागणी केली.
शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा लागतो. त्यानुसार प्रशासनाकडून हा अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाणार आहे. तसेच, पाटील यांचा माध्यमिकचा पदभार काढून घेण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर झाला.
पदभार काढून त्यांचा प्रभारी पदभार हा समकक्ष अधिकाऱ्यांकडे देणे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाप्रमाणे अभिप्रेत आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, योजना शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यापैकी एकाकडे पदभार जाणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत दोन्ही अधिकारी कार्यरत आहेत.
यापूर्वी माध्यमिकचा पदभार अनेकदा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेच सोपविण्यात आलेला आहे. मात्र, प्रशासनाने शासन नियम डावलत पाटील यांचा पदभार हा माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी देवरे यांच्याकडे दिला आहे.
प्रवीण पाटील ‘मॅट’मध्ये
तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची काही महिन्यांपूर्वी तक्रारींवरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या विरोधात त्यांनी ‘मॅट’कडे दाद मागितली होती. त्या वेळी ‘मॅट’ने शासनाला फटकारत पाटील यांच्या बदलीस स्थगिती दिलेली होती.
त्यामुळे पाटील यांनी पुन्हा काम सुरू केले. आता बनावट भरती प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यात त्यांचा थेट संबंध येत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते ‘मॅट’मध्ये जाऊन दाद मागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.