नाशिक : राज्यातील कोरोनामुळे (coronavirus) निर्माण झालेली परिस्थिती, तसेच जुलै व ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रेशन दुकाने सुरू करण्यात येतील. पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या प्रयत्नानांना यश मिळाले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना अखेर यश
राज्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी रास्त भाव दुकानांची पुर्नरचना करण्याची कार्यवाही यापूर्वी झाली होती. मात्र, या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहीरनाम्यास स्थगिती दिली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार आहेत.
मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही सरकारची जबाबदारी - भुजबळ
सद्यस्थितीत कोरोना संसर्गाने राज्यात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत रेशन दुकानांतून राज्यातील गरीब जनतेला अन्नधान्य, रॉकेल वाटपाचे महत्वपूर्ण कार्य सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात जुलै व ऑगस्ट पावसामुळे अनेक शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रेशन दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य आहे. शहरांची मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही सरकारची जबाबदारी ठरते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.