नाशिक : एखाद्या हॉस्पिटलला आग लागल्यास कमीत- कमी वित्त व जीवितहानी होण्याच्या दृष्टीने दर वर्षी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील १६० खासगी रुग्णालयांच्या आस्थापनेने अद्याप फायर ऑडिट न केल्याने अशा रुग्णालयात जाणे धोक्याचे असल्याचा निष्कर्ष काढत रुग्णांना देखील दाखल करताना विचार करा असा अप्रत्यक्ष सल्ला दिला जात आहे. तर, दुसरीकडे फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक असल्याचे बजावताना तसे न झाल्यास पाणी व वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना अग्निशामन विभागाने दिल्या आहे. (Check Fire Audit while going to hospital Nashik Latest Marathi News)
देशात काही खासगी कार्पोरेट रुग्णालयांना आग लागून जीवितहानीची घटना घडली होती. त्यानुसार खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले. त्याअनुषंगाने महापालिकेकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात फायर ऑडिट करून घेण्याची नोटीस बजावली जाते. या वर्षीदेखील शहरातील ६२९ रुग्णालयांना अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही, याचा दाखला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
परंतु, ६२९ खासगी रुग्णालयांपैकी फक्त ४६९ रुग्णालयांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फायर ऑडिटचा दाखला सादर केला आहे. १६० रुग्णालयाने अद्यापही फायर ऑडिट न केल्याने त्या रुग्णालयांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.
हॉटेलमध्ये जाणेही धोकादायक
रुग्णालयांप्रमाणेच हॉटेललाही फायर ऑडिट बंधनकारक आहे. शहरात ५३८ हॉटेल, रेस्टॉरंट बिअर बार व लॉज आहेत. त्यापैकी फक्त ८३ हॉटेल्स रेस्टॉरंटकडूनच फायर ऑडिट करण्यात आले आहे. ४५५ हॉटेल्स व रेस्टॉरंट मालकांनी ऑडिट केलेले नाही. त्याअनुषंगाने तेथेही अग्निशमन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.