chandrashekhar bawankule uddhav thackeray news esakal
नाशिक

Nashik Political News : ‘उबाठा’ गटाला भाजपकडून चेकमेट! उद्धव ठाकरे यांच्याआधी श्री काळाराम आरती

भाजपकडून शिवसेनेला चेकमेट देण्याचा हा प्रयत्न राज्यभर चर्चेत आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्‍घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार असल्याने ठाकरे यांच्या आरतीच्या भूमिकेला छेद देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यापूर्वीच श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.

भाजपकडून शिवसेनेला चेकमेट देण्याचा हा प्रयत्न राज्यभर चर्चेत आला आहे. (Checkmate from BJP to thackeray group Shri Kalaram Aarti before uddhav Thackeray Nashik Political News)

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. त्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. नाशिकमध्ये ‘महाविजय २०२४’ च्या परिपूर्तीसाठी मंगळवारी (ता. ९) नाशिकसह चार लोकसभा मतदारसंघांतील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत १२ ते १.३० पर्यंत नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतील कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठक स्वामिनारायण बॅंक्वेट हॉल येथे होणार आहे.

या बैठकीत चार लोकसभा मतदारसंघातील रणनीती ठरविली जाणार आहे. त्यासाठी भाजपने समन्वयक नियुक्त केले असून, त्यांच्याकडून या लोकसभांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात सध्याची स्थिती, खासदारांनी केलेली कामे, संभाव्य उमेदवारांच्या नावावरही चर्चा करणार आहे.

त्यानंतर दोन ते चार या वेळेत नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभेतील १२ विधानसभेच्या सुपर बूथ वॉरियर्ससोबत संवाद होणार आहे. लंडन पॅलेस येथे ही बैठक होईल. त्यानंतर भाजप कार्यालयात विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.

काळारामाची महाआरती

२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन होणार आहे. हा सोहळा नयनरम्य करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. तीन हजार प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करताना शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही.

त्यामुळे शिवसेनेच्या उबाठा गटाकडून शिवसेना कार्यकर्ता शिबिराच्या निमित्ताने श्री काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.

या भूमिकेला चेकमेट म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यापूर्वी म्हणजे मंगळवारी (ता. ९) सकाळी अकराला श्री काळाराम मंदिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महाआरती करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT