Sarpanch Rohidas Katore and Gram Panchayat officials inspecting the chemical water released by an unknown vehicle in a drain on the Nashik-Mumbai highway. esakal
नाशिक

Nashik News: वाडिवऱ्हेच्या नाल्यात सोडले केमिकलयुक्त पाणी; प्रदूषण नियंत्रण विभाग दखल घेणार का?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाडीवऱ्हेजवळील नाल्यात अज्ञात कंपनीने केमिकलयुक्त दूषित पाणी सोडल्याने नाल्याचे संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या नाल्याचे पाणी मुकणे धरणाला जाऊन मिळत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे.

दूषित पाणी सोडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सरपंच रोहिदास कातोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस कारवाई का करत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (Chemical water released in Wadivarhe drain Will pollution control department take notice Nashik News)

नाशिक- मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे ते रायगडनगर दरम्यान अनेक नवीन कंपन्या झाल्या आहेत. या कंपन्याचे केमिकलयुक्त दूषित पाणी आणून नाल्यात सोडले जाते किंवा टँकरसारख्या वाहनातून परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये ते रात्री अपरात्री सोडून दिले जात आहे.

हे पाणी शेतकऱ्यांच्या भातशेतीतून थेट नाल्याद्वारे मुकणे धरणाला जाऊन मिळते. या पाण्यामुळे नाल्याचे पाणी अतिशय लाल व काळे झालेले दिसत आहे. मुकणे धरणाचे पाणी नाशिक महानगरपालिका वापरते, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

भात शेतीतूनही जात असल्याने शेतीला नुकसानकारक असून नाल्याला लागून असलेल्या विहिरींना देखील हे दूषित पाणी उतरत असल्याने ते जनावरांसाठी देखील धोकादायक ठरू शकते.

यासाठी कंपन्यांनी प्रक्रिया करून या पाण्याचे योग्य ते नियोजन करावे अशा सूचना ग्रामपंचायतीने सर्वच कंपन्यांना केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नाल्यात सोडलेल्या या दूषित पाण्याची पाहणी केली आहे.

अशा प्रकारे केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडणाऱ्या कंपन्या तसेच टँकरमधून केमिकल सोडणाऱ्या वाहनचालकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील कंपन्या दूषित केमिकलमिश्रित पाणी टँकरद्वारे किंवा पाइपलाइनने शेजारच्या नाल्यात सोडतात. काही महिन्यांपूर्वीच अस्वली स्टेशन ते साकूर रस्त्यावर उंडओहोळ नाल्यात केमिकलमिश्रित पाणी टाकताना टँकरचालकास स्थानिक शेतकऱ्यांनी पकडले होते.

याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तरीही अशा प्रकारे दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण कमी होत नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे.

दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन चौधरी आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी पाण्याचे नमुने घेतले असून त्याचे परीक्षण करून अहवाल घेऊ व या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करू असे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT