Chhagan Bhujbal : नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालील भागात अनधिकृत विक्रेते तसेच पार्किंगमुळे विद्रूपीकरण होत आहे. तसेच रस्ता खराब झाल्याने अपघात होत आहेत.
त्यामुळे नाशिक महापालिका, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलिस विभागाने एकत्रितरीत्या काम करून अतिक्रमण हटवावे. रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरणाची कामे तातडीने करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न- नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. (Chhagan Bhujbal advises officials in meeting Remove encroachment under flyover and beautify nashik)
नाशिक कार्यालयात मंगळवारी (ता. १) भुजबळ यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त नितीन नेर, सहाय्यक सुरेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की शहरातील उड्डाणपुलाखाली मुंबई नाका ते आडगाव नाका परिसरात अनधिकृत विक्री व वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याठिकाणी विक्रेत्यांकडून कचरा टाकला जात आहे. तसेच, त्या ठिकाणी केलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचे नुकसान होत आहे. त्यामुळे अतिक्रमण तातडीने दूर करावे.
"उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुंबई नाका, द्वारका सर्कलला वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे अभ्यासगट नेमून या दोन्ही सर्कलची रुंदी कमी करावी." - छगन भुजबळ, अन्न व नागरीपुरवठा मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.