chhagan bhujbal esakal
नाशिक

'संमेलन अन्‌ वाद नवा नाही' - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

तुषार महाले

नाशिक : येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi Sahitya Sammelan) भुजबळ नॉलेज सिटीचा आग्रह नव्हता संमेलनात सेवा करायला मिळणार याचा आनंद असून संमेलन स्थळ बदलल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटल्यावर सुरवातीपासून शेवटपर्यंत वाद विवाद हा नवा नाही, त्याशिवाय संमेलन पुर्णत्वास जावू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. भुजबळ नॉलेज सिटी (मेट) याठिकाणी रविवारी (ता.७) साहित्य संमेलन समिती सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनासाठी पुर्वीचे ठिकाणही चांगले होते. गोसावी सरांनी सहकार्य केले, सर्वांनी भुजबळ नॉलेज सिटीतील संमेलन स्थळाला मान्यता दिली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे संमेलनस्थळाची पाहणी करणार आहेत. संमेलनात पावसाची अनिश्चितता बघता त्यापद्धतीने नियोजन करत शिस्तबद्ध कार्यक्रम करण्याच्या सूचना स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी केल्या. संमेलन नाशिककरांचे असून यशस्वी करण्यासह ऐतिहासिक संमेलन झाल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, मेट संमेलन समन्वयक शेफाली भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, समिती मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, कार्यवाह, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, किरण समेळ आदींसह चाळीस समित्यातील सदस्य उपस्थित होते.

पाहुण्यांची व्यवस्था करा

संमेलन स्थळ सजवत वातावरणनिर्मिती करून संमेलनातील कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे स्वागत करताना हार, शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र, स्मरनिका, नारळ इतक्या गोष्टी न ठेवता मोजक्या गोष्टी ठेवा, स्वागत करताना सुटसुटीतपणा ठेवा, धावपळ होईल असे नियोजन न करता पाहुण्यांची राहण्याची, गाड्यांची व्यवस्थित व्यवस्था असली पाहिजे. अशा सूचना स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी समिती सदस्यांना दिल्या.

वडाळा नाका, निमाणी बस स्टॉप हब

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार्या संमेलनासाठी शहरातील विविध ठिकाणांहून बसेस सुटणार आहेत. त्यासाठी वडाळा नाका, निमाणी बस स्टॉप हब असतील तसेच शहरात बसेसचे चौदा मार्ग निश्‍चित करण्यात आली असून ‘हात दाखवा संमेलनाला या’ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाला येण्यासाठी गाडीचा उपयोग न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे संमेलन समिती समन्वयक विश्‍वास ठाकुर यांनी नमूद केले.

समिती सदस्यांनी केली जागेची पाहणी

संमेलनाच्या नियोजनासाठी चाळीस समित्या गठित करण्यात आल्या आहेत त्यांच्या माध्यमातून संमेलनाचे कामकाज सुरू आहे. नवीन संमेलन स्थळाची माहिती गेल्या रविवारी समिती प्रमुखांना देण्यात आली होती. रविवारी (ता.७) समिती सदस्यांना संमेलनस्थळाची माहिती श्री. ठाकुर यांनी दिली. दरम्यान, सर्व समित्यांनी बैठक घेत अडचणींवर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT