Sharad Pawar-Chhagan Bhujbal  Esakal
नाशिक

Chhagan Bhujbal on Sharad Pawar: पक्षफुटीला मला का जबाबदार धरताहेत? छगन भुजबळ यांचा पवारांना प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : माझा आणि शरद पवारसाहेबांचा संबंध येण्याआधी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आदी त्यांच्या विश्वासातील लोकांनी साथ सोडल्याने घरातूनच बंड झालेले असताना आंबेगावची सभा रद्द करून शरद पवारसाहेबांनी येवल्यात पहिली सभा घेतली.

त्यांचे माझ्यावर एवढे प्रेम का? हा प्रश्न मलाही पडला आहे. साहेब येवल्याप्रमाणेच इतर प्रत्येकाच्या मतदारसंघात जाऊन अशीच माफी मागणार का? राष्ट्रवादीतील फुटीला मला का जबाबदार धरण्यात येत आहे असा प्रश्न श्री. भुजबळ यांनी रविवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत केला. (Chhagan Bhujbal question to Sharad Pawar Why you holding me responsible for split of ncp nashik political)

येवला येथे घेतलेल्या जाहीर सभेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी रविवारी श्री. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप एकत्र येण्यामागे मी सूत्रधार असावा, अशी पवारसाहेबांची धारणा असावी. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या, तेव्हा तेव्हा दस्‍तुरखुद्द शरद पवार यांनी चर्चेसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा जयंत पाटील यांनाच पाठविले आहे.

हे सगळे भाजपशी चर्चा करीत असताना मी कधी तुरुंगात होतो, तर कधी भाजपशी लढत होतो. चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळेच भाजपने शिवसेनेची साथ सोडली.

२०१९ ला भल्या पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ज्या चर्चा झाल्या, त्या किंवा निर्णय प्रक्रियेत मी होतो कुठे? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला मला का जबाबदार धरले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दराडे बंधूंचे योगदान काय?

येवला मतदारसंघात उमेदवारी हा माझा स्वतःचा निर्णय होता. मी सुरक्षित अशा जुन्नर मतदारसंघातून लढावे, अशी शरद पवार यांची इच्छा होती. पण येवल्यातील मतदारांनी विकासासाठी येवला निवडावा, अशी मागणी केल्याने मी येवला निवडला.

येवला येथील प्रश्न सोडविण्यात मी यशस्वी ठरल्याने पवारसाहेबांनी माफी मागायचा विषयच नाही. ज्या माणिकराव शिंदे यांनी जाहीर सभा घेतली, त्यांना पक्षाने दोन वर्षांपूर्वीच शिस्तभंगाची कारवाई करून काढले आहे.

व्यासपीठावर जे दराडे बंधू दिसले, त्यांचे येवल्यासाठी काय योगदान आहे. उरलेल्या ज्येष्ठ नेत्यांची मुले आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आता येवल्याप्रमाणे वेगळी भूमिका घेतलेल्या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन माफी मागणार का? ओबीसी नेता म्हणून येवल्यात पहिली सभा घेतली का? असे अनेक प्रश्न श्री. भुजबळ यांनी उपस्थित केले.

भुजबळांचे बोल

- राष्ट्रवादीच्या दुहीमागे अदृश्य नव्हे, तर घरातीलच हात

- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेत नेताच

- नाशिक साहेबांचे असेल, तर खासदार पडतात कसे?

- शरद पवार यांच्या साथीमुळे राजकीय संधी हुकल्या

- तेलगी प्रकरणात माझा विनाकारण राजीनामा घेतला

- शिवसेना युतीतून बाहेर पडण्यामागे पवार साहेबच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT