Chhagan Bhujbal, Seema Hire and beneficiaries during the 'Anandacha Shidha' distribution program  esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : जिल्ह्यातील 7 लाख लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा; छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरण

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal News : नाशिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

शनिवारी (ता. ९) शहरातील वीर सावरकर हॉल, सावतानगर, सिडको येथे आनंदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. (chhagan bhujbal statement about 7 lakh 78 thousand beneficiaries will get benefit of Anandacha Shida nashik news)

छगन भुजबळ म्हणाले, शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

गौरी गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रतिशिधापत्रिका धारकांना ई-पॉ स प्रणालीद्वारे केवळ १०० रूपयांत वितरित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.

असून शहरातील 230 रास्त भाव दुकानांतून शिधा संचाचे वाटप होणार आहे. भुजबळ म्हणाले, आनंदाचा शिधा हा शिधापत्रिकाधारकांचा हक्क असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोचला पाहिजे, या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आनंदाचा शिधा वाटपाचा घेतलेल्या निर्णयामुळे सणाचा आनंदाचा गोडवा निश्चितच वाढणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

कार्यक्रमास पुरवठा विभाग उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, नानासाहेब महाले, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, आर. आर. पाटील, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, दत्ताकाका पाटील, प्रा. ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र पाटील, मुकेश शेवाळे, संतोष भुजबळ, रवींद्र शिंदे, अक्षय परदेशी, दिलीप तुपे, आबा आमले यांच्यासह रास्तभाव दुकानदार व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT