Chhagan Bhujbal News esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : शरद पवार यांच्या राजीनाम्याची अजित पवारांना पूर्वकल्पना : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अर्धा कार्यक्रम सोडून मी न्यायालयात गेलो असता, तिथे मला समजले की शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्या वेळी मला धक्का बसला. (Chhagan Bhujbal statement about ajit pawar already known about sharad pawar resign nashik news)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा दिला, त्या राजीनाम्याची पूर्वकल्पना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांना होती, असा गौप्यस्फोट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

शनिवारी (ता. ६) नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, राजीनाम्याच्या घडामोडीत मी नव्हतो; परंतु अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांना कल्पना होती. अचानक न्यायालयात काम आल्याने अध्यार्तून कार्यक्रम सोडून जावे लागले. त्याच ठिकाणी राजीनाम्यासंदर्भात समजल्यानंतर धक्का बसला.

पवारांच्या राजीनाम्याला माझा विरोध होता. सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील विरोध केला. अध्यक्ष निवड समिती गठित केली. परंतु समितीला मान्य नसल्याने विरोध केला. माझी भूमिका मी त्या वेळी स्पष्ट केली होती. परंतु शरद पवार यांच्या राजीनाम्याची कल्पना कुटुंबातील नेत्यांना होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, की लोकांची भावना समजून घेतली पाहिजे. उद्योग आले पाहिजेत, पण त्याचा पर्यावरणाला किती धोका आहे, हेही तपासणे गरजेचे आहे. प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही. समर्थन व विरोधात आंदोलन करू नये. एकमेकांना भिडण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे जात आहेत त्यांना माहिती मिळाली पाहिजे, त्यानंतर ते त्यांचे मत व्यक्त करतील.

वज्रमूठ सभा तहकूब

शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द झाली नसून उष्णतेमुळे वज्रमूठ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. सातत्याने सभा घ्यायच्या का, हा विचारही पुढे आला. त्यामुळे निर्णय घेतल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT