Chhagan Bhujbal : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलले जातील याची माहिती माझ्याकडे नाही. मात्र जर-तर चर्चेच्या आधारे फार तर मुख्यमंत्री बदलू शकतील, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले.
तसेच विरोधीपक्षनेते अजित पवार हे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात असल्याने मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे त्यांनी म्हटले त्यात चूक नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Chhagan Bhujbal statement about ajit pawar chief minister nashik political news)
पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात सोळा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुरू आहे.
सोळा आमदारांच्या विरोधात निकाल गेल्यावर त्यात मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा होत असताना विरोधात निकाल जाईल याची खात्री काय? हाही एक प्रश्न आहे. समजा, सोळा आमदार अपात्र ठरले, तरीही राज्यातील सध्याच्या सरकारला १४९ आमदारांचा पाठिंबा असल्याने मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात.
महाविकास आघाडीत बिघाडी नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आघाडीविषयक वक्तव्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की श्री. पवार हे नक्की काय बोलले हे माहिती आहे का? आघाडी येतात आणि बिघाडी होते. मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असे नाही. श्री. पवार यांनी आघाडी तुटेल असे म्हटलेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.