chhagan bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal: राममंदिरासह शिवमंदिरामध्ये ठीक, परंतु लोकशाही मंदिरात अपेक्षित नव्हता सोहळा : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : नवीन संसद भवनाच्या उद्‍घाटन सोहळ्याविषयीच्या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या सोहळ्याबद्दल वाईट वाटल्याची प्रतिक्रिया नोंदविली.

तसेच धर्मकांडमध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद वाटला, अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेचा धागा पकडून असा सोहळा राममंदिर, शिवमंदिरात ठीक होता; परंतु लोकशाही मंदिरात अपेक्षित नव्हता, असे टीकास्त्र श्री. भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षावर सोडले. (Chhagan Bhujbal statement about inauguration ceremony of new Parliament building expressed regret over ceremony nashik news)

देशात लोकशाही व्यवस्था आहे. राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र की मनुतंत्र आहे, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे म्हटले आहे.

पहिल्या संसद भवनावेळी स्वातंत्र्याचे लढवय्ये होते. आता मात्र उघडीबंब माणसं होती. त्यांच्यामध्ये पंतप्रधान उभे होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी

दिल्लीच्या महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे, ती झाकून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहेत.

त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे, असे सांगून मुद्रा झाकून आणि पुतळे हटविण्याचे काम जाणीवपूर्वक केले का? हे शोधले पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी श्री. भुजबळ यांनी केली.

ते म्हणाले, की महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असताना कार्यक्रम त्यामध्ये का घेण्यात आला नाही? त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. हा मूर्खपणा कुणी केला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छगन भुजबळ म्हणालेत...

- कर्नाटकमध्ये झालेले पानिपत पाहता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचे पाऊल उचलले जाईल असे वाटत नाही. आम्ही निवडणुकीला तयार आहोत.

- नाशिक जिल्हा बँक दिवसाढवळ्या काही लोकांनी लुटली. बँकेवर प्रशासक यावेत म्हणून मी प्रयत्न केला. त्यामुळे बँक पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये.

- बूथ कमिट्यांसाठी धनंजय मुंडे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल काही जण गैरसमज पसवत आहेत. मात्र पुण्यातील जबाबदारी पाहता अजित पवार यांना बाजूला केले का? हा खरा प्रश्‍न आहे.

- नाशिकमधील गुन्हेगारी पोलिसांनी रोखली पाहिजे. पोलिसांना कोण रोखतंय? हा खरा प्रश्‍न आहे. पोलिसांची जरब राहिली नाही. नाशिक-पुणे-मुंबईसारखे मोठे शहर नसल्याने गुन्हेगारी नियंत्रणात आणली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT