Chhagan Bhujbal News : मला वारंवार धमकीचे फोन व मेसेज येत आहेत. परंतु धमक्यांना घाबरणारा मी नाही. संकटांना धैर्याने तोंड देणे, हा माझा स्वभाव आहे. धमकीतून मारायची भाषा केली जात आहे.
समाजाच्या चांगल्यासाठी मेलो तर काय बिघडलं, असा सवाल करताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी, मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं. मराठ्यांनी मोठं केलं, असे सांगून शिव्या देत असल्याची पुस्ती जोडली. (chhagan bhujbal statement about Threatening phone calls and messages nashik news)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील व छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. शनिवारी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होती, त्यापूर्वी शुक्रवारी भुजबळ यांना धमकीचे संदेश आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी त्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दिली. त्या अनुषंगाने भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, लोक आजारपणात, अपघातात मरतात. समाजाच्या चांगल्या कामासाठी मेलो तर चांगले आहे. राज्यात ३७५ जाती असून, मी काही एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही. शेवटपर्यंत ओबीसी वर्गासाठी काम करीत राहील. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या माझा विरोध नाही, ही माझी भूमिका मांडली आहे. ती यापूर्वी देखील मांडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, नाना पटोले आणि मराठा समाजातील नेतेसुद्धा हेच बोलत आहे. म्हणून भुजबळ विरोध आहे, असं वाटते.
मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला. मात्र मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही. माझ्यामुळे त्यांच्यात अजिबात फूट पडणार नाही. पाटील हे काय बोलतात ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे. मराठा समाजाची नाही. अनेक लोक माझ्यामागे लागले आहेत. त्यामुळे एक अजून लागले तर काही होणार नाही. मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे-पाटील सभेत सांगतात. मी पण मेलो तरी हटणार नाही, असा निर्धार भुजबळ यांनी या वेळी व्यक्त केला.
बाळासाहेब व शिवसेनेमुळे मोठा
मराठा बांधवांसाठी शरद पवार यांच्यासोबत माझेही योगदान आहे. १९९१ मध्ये मी ओबीसींच्या प्रश्नावर शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मी ओबीसी समाजाचा प्रचार व प्रसार केला. मात्र आज मला मराठ्यांनी मोठं केलं, असं सांगून शिव्या देतात; पण मला मोठे केलं ते शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांनी, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.