Chhagan Bhujbal : कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला, तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. कारण येवला-लासलगावमधील लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. अनेकांचे पतंग कापण्याचे ट्रेनिंग मी घेतले आहे आणि ते कापणारच, असा सूचक संदेश मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १४) दिला.
मकरसंक्रांतीनिमित्त मतदारसंघात मुक्कामी आलेल्या मंत्री भुजबळ यांनी खास शैलीत पतंगोत्सवाचे कौतुक करून राजकीय टोलेबाजी केली. (chhagan bhujbal statement of trained many people to cut kites and will cut them nashik news)
सोमवारी (ता. १५) मकरसंक्रांतीनिमित्त मंत्री भुजबळ पतंगबाजी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी सवांद साधताना, त्यांनी राजकीयसंदर्भ घेऊन शाब्दिक पतंगाला ढील दिली. मकरसंक्रांतीला यापूर्वी मी अनेकदा येथे आलो आहे अन् यापुढेही येत राहील. यापूर्वी मी अनेकांचे पतंग कापले आहे, पण अनेकांचे पतंग कसे कापायचे, याचे मी ट्रेनिंग घेतले आहे. त्यादृष्टीने काम करणार आहे.
कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला, तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही. कारण येवला-लासलगावमधील लोकशक्तीचा मांजा अजून अतिशय भक्कम आहे. येवल्याचा पतंगोत्सवाचा काही लोकांनी बेरंग होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी होती. मांज्याला बंदी असूनही वापर होतो, हेही चुकीचे आहे. हा मांजा मी पहिला आहे.
अतिशय बारीक असल्याने लक्षातही येत नाही. त्यामुळे मांज्याची माहिती मिळताच कोणीही असला, तरी पोलिसांना कळविले पाहिजे. लोकांचा जीव जाण्यात असुरी आनंद आहे. त्यामुळे खेळासारखा खेळ खेळला पाहिजे. जनतेच्या हितासाठी हा मांजा कोणी वापरू नये व विकू नये, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.
मुख्यमंत्रिपदाच्या महादेव जानकर यांच्या प्रतिक्रियेवर विचारले असता, श्री. भुजबळ म्हणाले, की मुख्यमंत्री होणे न होणे, हे जनतेच्या हातात आहे. मात्र, मला मुख्यमंत्री किंवा आमदारपदाची ओढ नाही. मी मागासवर्गीयांसाठी काम करीत राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.