नाशिक : विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप (BJP) पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केले असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative council election) कंबर कसावी लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडले. राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal statement on legislative council elections Nashik News)
या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला गेला. तसेच विधान परिषदेवर सुद्धा आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी कोणतीही घटना घडणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळांचा नूपूर शर्माच्या वक्तव्यावर निशाणा
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आपल्या संविधानात प्रत्येक धर्माचा मान राखावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माबाबत कोणीही अद्वातद्वा बोलू नये. तसेच एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याची शिक्षा विदेशात राहणाऱ्या वा विदेशात आपले उत्पादन विकणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना मिळू नये, त्यांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.
एखाद्या पक्षातील माथेफिरू लोक केवळ प्रसिद्धीसाठी अशी चुकीची वक्तव्ये करतात. भारत सरकार मुस्लिम देश, मुस्लिम संघटना यांच्याशी चर्चा करून मार्ग काढेल अशी आशा वाटते, असेही भुजबळ म्हणाले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.