Chhagan Bhujbal News : गौरी-गणपती सणानिमित्त आगामी दोन दिवसांत राज्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप पूर्ण करण्यात येईल.
जिल्ह्यातील ३६ लाख नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याने गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव गोड होईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal statement over anandacha shidha nashik)
आंबेडकरनगरमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहात ‘आनंदाचा शिधा’ वाटप कार्यक्रम झाला. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश निसाळ, तहसीलदार कैलास पवार आदी उपस्थित होते
. श्री. भुजबळ म्हणाले, की सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६०९ दुकानांतून सात लाख ७८ हजार शिधासंच वाटप होईल. गौरी-गणपतीसह दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.
नाशिक शहरात २२९ दुकानांतून ९७ हजार ६१६ शिधावाटप संचाचे वितरण सुरू असून, चार लाख लाभार्थ्यांना लाभ मिळेल. आनंदाच्या शिधा वाटपात एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकारी व रेशन दुकानदारांनी घ्यावी.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
श्रीलंकेत सर्वप्रथम वृक्षारोपण झालेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण २४ ऑक्टोबरला नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
प्रा. फरांदे म्हणाल्या, की सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत असून, गणपतीच्या अगोदर सर्व नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप होत आहे. त्यामुळे राज्यातील गरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत आहे. श्री. मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.