Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal while speaking at the conclusion of the cooperative meeting held here by the Federation of State Co-operative Credit Societies. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal: जिल्हा बॅंक, पतसंस्थांचे प्रश्न सोडविणार : छगन भुजबळ यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : राज्यातील सहकार क्षेत्राने देशाला दिशा दिलेली असताना या क्षेत्रात काही मंडळींनी स्वाहाकार केल्याने राज्यातील सहकार अडचणीत आला. सहकार क्षेत्र पुन्हा वाढवायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा बॅंक आणि पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal testimony Will solve the problems of district banks credit institutions nashik)

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन (पुणे), महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था (सातपूर) व नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे आयोजित दोनदिवसीय सहकार मेळाव्याच्या समारोप सत्रात रविवारी (ता.३०) ते बोलत होते.

त्यांच्या हस्ते सहकार मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महारुद्र पतसंस्थेचे संस्थापक सदाशिव माळी, परसरामगिरी महाराज, नारायण वाजे, ॲड. अंजली पाटील, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष गोरख बोडके, गोविंद माळी, श्रीराम मंडळ यांसह पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, की सहकारी चळवळीने देशातील कोट्यवधी लोकांना आपल्या पायावर उभं केलं. महाराष्ट्रातील शेतकरी ताठ मानेने उभा राहिला. त्याचा अभ्यास देशातील इतर राज्यांनी केला आणि आपल्या राज्यातही ही चळवळ रुजविण्याचा प्रयत्न केला.

सर्वांसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते जोपर्यंत सहकारात होते, तोपर्यंत सहकार चळवळीला देशभर भरभराट लाभली होती.

मात्र, सर्वांच्या हितापेक्षा स्वहित जपण्यास सुरवात झाली, त्यामुळे सहकारला गिळंकृत केले. सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्था आज आजारी आहेत. काही बंद, तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा बँकेचा प्रश्न सोडविणार

नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न तसेच राज्यातील पतसंस्थांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री व सहकारमंत्री यांच्याबरोबर लवकर बैठक घेऊन या संस्थांचे प्रश्न सोडविले जातील. शासन म्हणून या पुढील काळात सहकार क्षेत्रातील ज्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे भुजबळांनी सांगितले.

यांचा पुरस्काराने सन्मान

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सुरेश वाबळे, वासुदेव काळे, गोरख चव्हाण, नीलिमा बावणे, संदीप माळी, शशिकांत साळुंखे यांचा सहकारमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT