Bhujbal on Kesarkar esakal
नाशिक

Bhujbal on Kesarkar: देवाचा धावा करा अन आमची भरू द्या धरणे; भुजबळांचा केसरकरांना उपहासात्मक टोला

सकाळ वृत्तसेवा

Bhujbal on Kesarkar : शिर्डीत असताना आपण प्रार्थना केल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं विधान आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये केले.

त्यावर 'तुम्ही देवाचा धावा करा, आमची धरणं भरू द्यात' असा उपहासात्मक टोल अन्न/नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. आमची धरणं भरल्यानं आम्हाला आनंद होईल, असं श्री भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (chhagan Bhujbal trolls deepak Kesarkar nashik political news)

भिडेंवर कडक कारवाई व्हावी

मनोहर भिडे यांच्यावर आंब्याच्या वक्तव्याबद्दल आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असे सांगून श्री भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महात्मा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य आवडणार नाही.

मुळातच, जगात फार कमी देश असतील की, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. त्यामुळे भिडेंवर कडक कारवाई व्हावी या मताचा मी आहे.

त्यांच्याबरोबर (राजकारणाच्या दृष्टीने) जाणे म्हणजे आत्मघातकी आहे. गुजराती बांधव सहन करणार नाहीत. वास्तविक पाहता, भिडेंवर कारवाई कडक होत नाही, म्हणून ते रोज नवीन काहीतरी बोलतात.

पंडित नेहरू यांच्या वडिलांनी सगळं दान केलं. स्वतः नेहरू साडे अकरा वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी माहीत नव्हतं, स्वातंत्र्य मिळेल की नाही ?, त्यामुळे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर भलावण करू नका, स्तुती करू नका, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात आहोत, पण न्यायालयात तारीख मिळत आहे. भिडेंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही?

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मी रेल्वेने येतो

महामार्गावरील खड्यांविषयी बोलताना श्री भुजबळ म्हणाले की, आता काय करू, मी स्वतः रेल्वेने येतो. आमदार रेल्वेने आले. त्यामुळे तुम्ही दुरुस्त करा, पण खड्डे नाही असं म्हणू नका. मुंबई महापालिका कोल्ड मिक्स तंत्र वापरते, ते वापरून रस्त्यांची सुधारणा करा.

त्याचबरोबर नाशिकमध्ये नवीन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आलेत. नवीन दृष्टी प्रशासनाला लाभली आहे. सुधारणा होईल अशी अपेक्षा करू.

गालबोट लागू देऊ नका

मणिपूर घटनेच्या निषेध आंदोलनावेळी सटाण्यामध्ये घडलेल्या बाबींबद्दल श्री भुजबळ म्हणाले, मणिपूरमधील घटना सुबुद्ध लोकांना आवडली नाही.

पंतप्रधान यांनी निषेध केला आहे. निषेध करणे लोकशाहीचा अधिकार आहे. पण कायदा आणि सुव्यवस्था पाळावी. गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी.

गुन्हेगारीबद्दल योग्य पावले उचलतील

नाशिकमधील गुन्हेगारीबद्दल श्री. भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदारांनी चर्चा केली. मीही चर्चा केली. गाड्या जाळणारे लोक, तलवारी फिरवणारे याबद्दल त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे योग्य ती पावले ते उचलतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT