Chhagan Bhujbal : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जिल्हा व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करावी.
तसेच कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी मिळण्यासाठी नाशिक -त्र्यंबकेश्वर येथील कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Chhagan Bhujbals demand from government detailed project of Simhastha Kumbh Mela works should be prepared nashik news)
श्री. भुजबळ म्हणाले, की २०२६-२७ मध्ये नाशिक -त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केल्यास कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील.
नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांसाठी नाशिक महापालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त होत असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न साधूग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो.
त्यासाठी आतापासून नियोजन केले, तरच भूसंपादन करून त्याठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईत कामे केल्यास त्या कामांना दर्जा राहत नाही. विकासकामे दर्जेदार आणि दीर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.