During the rehearsal of the play Chhandchaya, the AC was switched off on Sunday, and the rehearsal was going on with the doors open. esakal
नाशिक

Nashik News : ‘छंदछाया’ नाटकात रसिक घामाघूम! कालिदासचा एसी बंद पडल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सांस्कृतिक चळवळींचे अधिष्ठान असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहामागील शुक्लकाष्ट संपलेले नसून रविवारी (ता. १४) सायंकाळी ‘छंदछाया’ या नाटकाच्या वेळी एसी बंद पडल्याने रसिक अक्षरश: घामाघूम झाले.

नाट्यकलावंत निर्मिती सावंत व वैभव मांगले यांनीही या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त करत अशीच व्यवस्था राहिली तर प्रयोग सादर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाटकाच्या मध्यंतरात काही प्रेक्षकांनी आपल्या तिकिटाचे पैसे परत घेत व्यवस्थापनाविरोधात रोष व्यक्त केला. (Chhandchhaya drama Displeasure among audience due to Kalidas kala mandir AC switched off Nashik News)

कोरोनानंतर कालिदासमधील कॅन्टीन बंद आहे. अशा परिस्थितीत भाडे कमी करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिल्यानंतर येत्या डिसेंबरपर्यंत २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. तरीही कालिदासची अवस्था काही सुधारण्याच्या टप्प्यात दिसत नाही.

रविवारी (ता. १४) सायंकाळी वैभव मांगले व निर्मिती सावंत या कलाकारांचा समावेश असलेले ‘छंदछाया’ हे नाटक सुरु होते. नाटक सुरु होण्यापूर्वीच कालिदासचा एसी बंद पडला. गेल्या दोन दिवसांपासून हा एसी बंद असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येते.

‘एसी’ च्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला गेल्या काही महिन्यांपासून पैसेच मिळालेले नसल्यामुळे त्याने एसी दुरुस्त न केल्याचे समजते. परिणामी, रविवारी ‘छंदछाया’ चा प्रयोग सुरु असतानाच प्रेक्षक मिळेल त्या साहित्याने स्वत: ला हवा घालत होते.

तर थोडीफार हवा आत येण्यासाठी कालिदासचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले. तरीही प्रेक्षकांना गरम होत असल्यामुळे त्यांनी मध्यंतरात एसी सुरु करण्याची मागणी करत गोंधळ घातला. अखेर एसी सुरुच होणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर काही प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत घेतले.

अखेर कलाकारांनी विनंती केल्यानंतर काही प्रेक्षकांनी घामाघूम होत, नाटक बघितले. ... कलाकारांवर माफी मागण्याची वेळ छंदछाया नाटकाच्या निमित्ताने मुंबईहून नाशिकला आलेले निर्मिती सावंत व वैभव मांगले यांनी प्रेक्षकांची अक्षरश: माफी मागितली. इतक्या गरम वातावरणात तुम्ही बसून आहात ही परिस्थिती आम्ही समजू शकतो.

पण आम्हीदेखील याच वातावरणात नाटक सादर करत आहोत. मुंबईहून आम्ही त्यासाठी आलो आहोत, त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून तुम्ही नाट्यगृह सोडून जाऊ नये, अशी हातजोडून विनंती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे काही प्रेक्षक दरवाजे उघडे ठेवण्याच्या अटीवर बसून राहिले. ‘कालिदास’विषयी अनेक तक्रारी कालिदास कलामंदिरमध्ये कलाकारांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रार सिनेअभिनेते प्रशांत दामले यांनीही यापूर्वी केली आहे.

त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून कालिदासचे रंगरूप बदलले पण, मूलभूत सुविधांचा आजही वानवा दिसून येतो. कॅन्टीन बंद, वॉशरुममध्ये पाणी साचलेले असते, तर ३० एप्रिल २०२३ ला एसी पहिल्यांदा बंद पडला होता.

त्यानंतर दुरुस्त झाला पण, शनिवार व रविवार या दोन महत्त्वाच्या दिवशीच एसी बंद पडल्याने कालिदासच्या व्यवस्थापनावर पुन्हा नामुष्की ओढवली आहे. .. पुढील आठवड्यातील प्रयोगांचे काय?

उन्हाळी सुट्या असल्यामुळे नाटकांसह विविध स्पर्धांसाठी कालिदासचे बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येते. येत्या १७ तारखेला अभिनेते अशोक सराफ येणार आहेत. तर २० तारखेला डॉ. गिरीश ओक, २१ ला सलिल कुलकर्णी, संदीप खरे त्यानंतर मुक्ता बर्वे यांसारख्या कलाकारांचे शो कसे होणार, याविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT