Shivraj Granth Rangoli esakal
नाशिक

Nashik News: शिवरायांच्या भव्यतेचे ग्रंथ रांगोळीतून दर्शन! 1 डिसेंबरपर्यंत उपक्रमाचा आस्वाद घेता येणार

प्रतीक जोशी

नाशिक : शिवरायांचा आठवावा प्रताप अन् आठवावी त्यांची भव्यता... या उत्कीला साजेसा उपक्रम नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेने साकारला आहे. कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची १७ हजार चौरस फुटांची ग्रंथ रांगोळी साकारली आहे.

या उपक्रमाचा उद्‍घाटन सोहळा सोमवारी (ता. २७) पार पडला. अभिनेते मिलिंद गुणाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे प्रमुख पाहुणे, तर एमकेसीएलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते.

या वेळी छत्रपती शिवराय शिष्यवृत्तीची घोषणा व श्रीकांत देशमुख लिखित कुळवाडीभूषण शिवराय या ग्रंथाच्या पाचव्या जनआवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले. (chhatrapati shivaji maharaj magnificence seen through Rangoli World record of MVP activity Nashik News)

मिलिंद गुणाजी म्हणाले, मविप्र संस्थेतर्फे असा अभिनव व विश्वविक्रमी उपक्रम राबविला गेला अन् त्याचा मी साक्षीदार झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे.

ग्रंथ रांगोळीची भव्यता, लहान मुलांनी साकारलेले किल्ले, शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन पाहून मी भारावून गेलो आहे, असे उपक्रम कायम राबविले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्वरूप सर्वांना दाखवता यावे व त्यातून एक विचारधन प्रत्येकापर्यंत पोचावे यासाठी हा उपक्रम संस्थेतर्फे साकारण्यात आला. ग्रंथ रांगोळीत श्रीकांत देशमुख लिखित कुळवाडीभूषण शिवराय ग्रंथाच्या ७५ हजार प्रती वापरण्यात आल्या आहेत.

या उपक्रमानंतर या प्रतींचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले जाणार असून, पुस्तकावर आधारित एक परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे छत्रपती शिवराय शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली. शिष्यवृत्तीची रक्कम दहा हजार रुपये असेल, असे त्यांनी नमूद केले.

त्रिपुरी पौर्णिमेला दिवे लावले जातात, मात्र संस्थेच्या माध्यमातून ही खरी त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली. ज्यात ७५ हजार ज्ञानदीप प्रज्वलित झाले, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी केले.

डॉ. भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले. विश्वासराव मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. तुषार पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या वेळी संस्थेचे पदाधिकारी यांसह वसंत गिते, शिवाजी चुंभळे, समीर वाघ, तसेच संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

नाशिककरांनी अनुभवावे शिवरायांचे भव्य रूप

महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शिवकालीन ६६ किल्ल्यांची निर्मिती केली होती. शिवरायांची प्रतिमेचा भव्य टाक, भवानी तलवार, वाघ नखे, कट्यार यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.

ढोलताशांच्या गजर व चिमुकल्यांनी साकारलेल्या शिवरायांच्या रूपाने परिसर शिवमय झाला होता. तसेच शिवरायांवर आधारित चित्र व शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

१ डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात या अभिनव उपक्रमाचा आस्वाद घेता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

शिवरायांच्या भव्य ग्रंथ रांगोळीचे वर्ल्ड रेकॉर्ड

मविप्र संस्थेतर्फे ७५ हजार पुस्तकांचा वापर करून १५२ फूट लांब, तर ११२ फूट रुंद या आकारात एकूण १७ हजार चौरस फुटात शिवरायांचे चित्र साकारण्यात आले आहे. यासाठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाची १३ विविध रंगात छपाई करण्यात आली.

या उपक्रमाची लंडन येथील वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पश्चिम भारत परीक्षक अमी छेडा यांनी विक्रमाचे प्रमाणपत्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांना हस्तांतरित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT