माळेगाव : `` माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने सुरुवातीपासूनच शहरवासियांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. नगरविकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत त्यांनी विकासाबद्दलची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. बारामती शहराचा आदर्श ठेवून माळेगावने राज्यात, देशात प्रगत व उपक्रमशील नगरपंचायत बनण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
'मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा -२०२३' स्पर्धेत माळेगावने मिळालेले यश हे सामुहिक प्रयत्नांचे फळ आहे. या यशाबद्दल मुख्याधिकारी, स्थानिक नेतृत्व व शहरवासियांचे अभिनंदन करतो,`` अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशंशा केली. तसेच त्यांनी माळेगावच्या भविष्यातील कामगिरीला शुभेच्छा दिल्या.
'मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३'मध्ये पुणे विभागात नगरपंचायत वर्गामध्ये माळेगाव (ता.बारामती) नगरपंचायतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच गतवर्षी माजी वसुंधरा अभियानात माळेगाव नगरपंचायत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने यशस्वी झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माळेगावच्या मुख्याधिकारी स्मीता काळे यांचा सन्मान केला.
त्यावेळी पवार बोलत होते. यापुढील काळात राज्यात, देशात 'शहरविकासाचे नवे मॉडेल' अशी ओळख निर्माण होण्यासाठी माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने स्थानिक नेतृत्व व नागरिकांना सोबत घेऊन काम करावे, अशी सूचना पवार यांनी केले.
ते म्हणाले,``विकासाच्या मुद्यावर मतभेद दूर ठेवून स्थानिक नेतृत्वानेही एकजुट व्हावे. शहराला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाणाऱ्या निर्णयांना सर्वांनी मनापासून साथ द्यावी. माळेगाव शहरवासियांची एकजूट, परस्पर सहकार्याची भावना आणि विकासाबद्दलची बांधिलकी या बळावर येणाऱ्या काळात माळेगाव शहराच्या विकासाचा वेग अधिक वाढेल. नगरविकासाच्या क्षेत्रात माळेगाव आदर्श निर्माण करेल,`` असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मुख्याधिकारी स्मिता काळे म्हणाल्या, की आजवर नियोजनबद्द काम केल्यानेच माळेगावकर अभिनंदनास पात्र ठरत आहे. यापुढील काळात माळेगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर व सक्षम बनवण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होणार आहे.
त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पुरेसा निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीकडून शहरविकासासाठी घेतल्या गेलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये गावकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मनापासून सहभागी व्हावे ही अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.