Court order esakal
नाशिक

Nashik News : चिखलीपाडा मेणबत्ती कारखाना स्फोटप्रकरणी; कामगार व औद्योगिक विभागाचे कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चिखलीपाडा (ता. साक्री) येथे मेणबत्ती कारखान्याला मागील हप्त्यात मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात कारखाना मालकासह चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा कारखाना अनधिकृतरीत्या सुरू होता. तसेच या ठिकाणी काही बालकामगार देखील काम करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. कामगार उपआयुक्त विकास माळी, औद्योगिक सुरक्षा विभागचे के. टी. झोपे आदींनी घटनास्थळी पाहणीकरून संबंधितांवर खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी सांगितले. (Chikhalipada candle factory explosion case Action Orders of Department of Labor and Industries Nashik News)

चिखलीपाडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटक पदार्थ वापरून मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला परवानगीच नाही, अशी माहिती पोलिस तपासात आली आहे.

घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मृतांच्या नातेवाइकांना दिले आहे.

मृत आशाबाई भागवत यांचे पती भय्या सुरेश भागवत यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भवानी सेलिब्रेशन वर्कशॉप हा वाढदिवसाचे सेलिब्रेशनसाठी स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना सुरेश माने (रा. धोत्री, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व रोहिणी जगन्नाथ कुंवर (रा. वासखेडी) यांच्या मालकीचा आहे.

वर्कशॉप सुपरवायझर म्हणून रोहिणी कुंवर यांचे वडील जगन्नाथ रघुनाथ कुंवर हे कामकाज पाहतात. अरविंद जाधव हा ऑपरेटर आहे. या कारखान्यात स्फोटक दारू वापरून स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचा वर्कशॉप कोणतीही शासकीय परवानगी न घेता सुरू होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बालकामगार मजुरीसाठी लावले होते. तसेच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. स्फोट झाल्यानंतर ऑपरेटर जाधव हा घटनास्थळावरून पळून गेला. घटनेतील पाच महिलांच्या मृत्यूस व जखमीस संशयित कारणीभूत झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या बाबत औद्योगिक सुरक्षा विभागाचे सह आयुक्त के. टी. झोपे व कामगार उपायुक्त माळी यांनी घटनास्थळी दाखल होत सर्व परिस्थितीची माहिती घेतली. तसेच या बाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

तर सदर घटना ही प्रथमदर्शनी शॉटसर्किटमुळे झाल्याचे समोर येत असले तरी तांत्रिक यंत्रणेद्वारे तपास करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT