While sending those children who were brought from Bihar to Nashik by train esakal
नाशिक

Child Trafficking: बिहारमधून नाशिकमध्ये आणण्यात आलेली 'ती' बालके सुखरूप रेल्वेने रवाना

अंबादास शिंदे

Child Trafficking : बिहारमधून नाशिकमध्ये आणण्यात आलेल्या त्या बालकांना रेल्वेने परत गावी रवाना करण्यात आले.

शुक्रवारी (ता. १६) या मुलांना बाल सुधारगृहात तुन नाशिक रोड रेल्वे स्थानकांवर आण्यात आले तेथून पोलीस बंदोबस्तात लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी एक्सप्रेसने स्पेशल डब्यातुन त्यांना रवाना करण्यात आले. (Child Trafficking case children brought from Bihar to Nashik left safely by train to bihar nashik news)

बिहारमधून नाशिकमध्ये आणण्यात आलेल्या त्या बालकांना परत गावी रवाना करण्यात आले. काही दिवासापुर्वी त्यांचे पालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अनेक दिवसांनी मुलांना भेटल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले होते.

रेल्वेतून या मुलांना नाशिक आणि जळगावमध्ये आणण्यात आलं होतं, यामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात होता. रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या 'ऑपरेशन आहट' अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८ ते १५ वयोगटातील मुलांना घेऊन जाणाऱ्या ५ व्यक्तींसह ५९ बालकांना ताब्यात घेण्यात आलं होते.

यामध्ये जळगावमधील २९ तर नाशिक जिल्ह्यातील मनमाड इथून ३० बालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर या मुलांना बाल सुधारगृहात दाखल करण्यात आलं आहे. ही मुले कोण आहेत? बिहारहून हे नेमके कुठे निघाले होते? यामगे काही वेगळा उद्देश होता का? यामागे मानवी तस्करीचा प्रकार आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पण ही मुलं बिहारची असल्याचं समोर आलं असून त्यांचे पालक त्यांना आपल्या घरी नेण्यासाठी नाशिक इथं दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर या पालकांची आपल्या मुलांसोबत भेट झाली. प्रशासनाकडून या मुलांची ओळख पटवण्यात आले आहे. अनेक दिवसानंतर भेटल्यानं पालकही भावनिक झाले होते.

पालक आणि मुलांची ओळख पटविण्याचं काम झाल्यानंतर मुलांचा ताबा त्यांच्या पालकांच्या हाती देण्यात येणार आहेत पटाणा येथे शासकीय तपास आणि कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं जाणार आहेत.

शुक्रवारी या मुलांना बाल सुधारगृहात तुन नाशिक रोड रेल्वे स्थानकांवर आण्यात आले तेथून पोलीस बंदोबस्तात लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी एक्सप्रेसने स्पेशल डब्यातुन त्यांना रवाना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT