नाशिक रोड : शहरातील कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोखा जपण्यात आपण सगळे एकजुटीने सहभागी होऊन चांगला आदर्श निश्चितच सर्व जनसामान्यांमध्ये निर्माण करू, एकात्मता प्रेम बंधुभाव ही मनुष्याची खरी नीतिमूल्य असावेत आणि त्याचं निरंतर आपण जपवणूक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोमवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. (Christmas Festival 2023 Unity love brotherhood true value of man Commissioner Sandeep Karnik nashik)
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देत आपण मला ज्या आस्थेने आणि सन्मानपूर्वक स्वागत करत पवित्र मंदिरात मानाच्या ठिकाणी बसवत याबद्दल मी ख्रिस्त मंडळाचे तसेच येथील महागुरु व धर्म प्रांतातील सर्व ख्रिस्ती बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो, व सर्वांना नाशिक शहर आयुक्तालयाकडून नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देत आपणा सर्वांच्या चांगल्या आरोग्याची देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो सामाजिक सलोखा हा कायमच जपला पाहिजे.
आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी व समस्या असल्यास आपण त्या माझ्याकडे कधीही मांडू शकतात, माझ्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला कधीही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
यावेळी नाशिक धर्मप्रांथाचे महागुरु लुड्स डॅनिअल, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे, रामदास शेळके, फादर नल्यास्को गोम्स, फादर पीटर डिसूझा, फादर संतान रॉड्रिग्ज, फादर जोसेफ, सिस्टर आसिस फर्नांडिस, सिस्टर मिलबुर्गा, सिस्टर ललिता, बेंजामिन खरात,
वॉल्टर कांबळे, मार्शल नडाफ, रुचीर खरात, नोएल दिवे, ऑस्टिन दास, राकेश साळवे, कुणाल पगारे, अमोल कांबळे, किशोर कदम, जॉन भालेराव, शशांक भालेराव, मंगल भालेराव, अनिता कदम, उज्वला पाळंदे, गीतांजली दिवे, सोफिया गोंसालविस, एनी थॉमस, ग्रेसी वाघमारे, संगीता थोरात, सुप्रिया पलगडमल आदी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.