Devotees attending Mass at Saint Anna Church esakal
नाशिक

Christmas Festival : नाशिक रोड परिसरात नाताळ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा सण असलेला नाताळ सण नाशिक रोड, जेल रोड, उपनगर परिसरात उत्साहात साजरा झाला. मध्यरात्रीपासूनच ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला, तसेच एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. (Christmas Festival Christmas spirit in Nashik Road area nashik news)

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे चर्च असलेल्या जेल रोडच्या संत अण्णा चर्चमध्ये शनिवारी (ता. २४) रात्री दहा ला नाताळ गीते सादर करण्यात आली. त्यानंतर अकराला महाधर्मगुरू बिशप लुईस डॅनियल यांनी पवित्रा मिस्सा अर्पण केली. या वेळी बिशप लुईस डॅनियल, फादर नोलॅस्को गोम्स, फादर विशाल त्रिभुवन, फादर जेरॉम परेरा, वॉटर कांबळे आदी उपस्थित होते.

उपनगर नाका येथील बाळ येशू मंदिरात मिस्सा झाली. मुक्तिधामसमोरील सेंट फिलिप चर्चमध्ये मिस्सा, केकचा प्रसाद वाटण्यात आला. या वेळी रेंव्हेट देवेंद्र शिंदे, सुनील कांबळे, कसबे, राकेश शिंदे, प्रदीप अंभ्यकर, यश गायकवाड, सायमन भंडारे आदी उपस्थित होते.

यावेळी बिशप ल्युडस डॅनियल म्हणाले, की, ख्रिस्त हा सर्वांसाठी आहे. तो शांती, दया, प्रेम यांचा संदेश देतो. येशूचा जन्म ही आख्यायिका किंवा नुसताच विचार नाही, तर ती एक सत्य घटना आहे. ख्रिसमस म्हणजे प्रभू येशूच्या आदर्श तत्त्वांनुसार आचरण करणे होय. दरम्यान, आज नाताळच्या दिवशी सकाळी आठला प्रार्थना झाली. फादर नोलासो गोम्स, वॉल्टर कांबळे यांनी मध्यवर्ती कारागृहात जाऊन प्रार्थना केली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बंदिवानांना केक वाटून त्यांच्यासमवेत नाताळ साजरा केला. या वेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. मुक्तिधामसमोरील चर्च, सेंट झेवियर्स शाळेतील बाळ येशू मंदिरातही मिस्सा झाल्या. सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. बाळ येशूच्या जन्मावर व जीवनावर आधारित देखावे चर्चेमध्ये साकारण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे. नाशिक रोड परिसरातील इंग्रजी व अन्य शाळांमध्ये नाताळनिमित्त सजावट करण्यात आली होती. विविध उपक्रम राबविण्यात आले.

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नाशिक-पुणे मार्गावरीलवरील सेंट झेवियर्स चर्चसह अन्य चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक कॅथॉलिक धर्म प्रांतात पाच जिल्हे येतात. या धर्म प्रांत अंतर्गत ३६-३८ धर्मगुरू आहेत. एक मुख्य महाधर्मगुरू आहेत. नाशिक रोडला धर्मगुरूंचे मुख्य निवासस्थान आहे. नाशिक कॅथॉलिक धर्म प्रांत पाचही जिल्ह्यांमध्ये ३४ चर्च येतात. नाताळच्या चार दिवस अगोदर सुवार्ता प्रार्थना मिस्सासह हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रार्थनेला सुरवात झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT