नाशिक : ख्रिसमसनिमित्त आलेल्या सलग सुट्यांचा लाभ घेत शहरात राज्यासह परराज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या पर्यटकांनी निसर्गरम्य तपोवन परिसरात मोठी गर्दी केल्याने दीर्घ कालावधीनंतर शहराचे पर्यटन बहरल्याचे सकारात्मक चित्र आहे. (Christmas Festival Tourists flock to Tapovan to celebrate Christmas nashik news)
नाताळाचे औचित्य साधत बच्चेकंपनीला सुट्या लागल्या आहेत. याशिवाय शनिवार, रविवार असे वीकेंडही जोडून आल्याने शहरात त्यातल्या त्यात पंचवटी परिसरात बाहेरील राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या पर्यटकांनी गंगाघाटासह तपोवनात गर्दी केली आहे.
गोदावरी प्रवाहित नसली तरी पर्यटक भाविक तपोवनातील मोक्षकुंड, सर्वधर्मसमभाव मंदिर, सीता मंदिर आदी ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे तपोवनाच्या अर्थकारणास बूस्टर डोस मिळाला आहे. येथील खेळण्यांसह खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्या पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
पोत लांबविली
सद्या सलग सुट्यांचे औचित्य साधत तपोवनात मोठी गर्दी उसळत आहे. या गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी आंध्र प्रदेशातून आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची पोत लांबविली. याचदरम्यान याठिकाणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाचे वाहन आले असता त्यांना याघटनेची माहिती देण्यात आली. त्यांनीही परिसरात शोध घेतला, परंतु चोरटे मिळाले नाहीत.
फवारणी सुरूच
सद्या गोदावरीतील प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे पात्रात फारसे पाणी नाही. त्यामुळे तपोवन परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण झाला आहे. हा फेस नाहीसा व्हावा म्हणून तपोवन फिल्टरेशन प्लॅन्टजवळून नदीपात्रात पाण्याची फवारणी सुरूच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.