crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख! वाढत्या घटनांमुळे नागरिक असुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली असून नवनवीन टोळ्या उदयास येत आहेत. या टोळ्या मोरक्यांच्या नांग्या आताच नाही ठेचल्यास तर भविष्यात सिडकोत भरदिवसा रक्ताचे पाट वाहतील, अशा संतापजनक प्रतिक्रिया सिडकोवासीयांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.

दोन महिन्यांपासून सिडको परिसरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. अंबड पोलिस ठाण्यास सक्षम अधिकारी मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Cidco crime increasing graph Citizens insecure due to increasing incidents Nashik Crime News)

अंबड पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बहीण- भावावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. काही दिवसांपूर्वी उत्तमनगर येथील महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाला होता.

या परिसरात पुन्हा नव्याने टोळ्या तयार होत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलादेखील स्वतःला सुरक्षित समजू शकत नाहीत. महिलांच्या छेड काढणे, विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे, चौकाचौकात भररस्त्यावर वाढदिवस साजरे करणे, अशा विविध घटना वाढत चालल्या आहे.

गुंडाच्या मनातील पोलिस प्रशासनाचे भय संपले आहे का, असा थेट सवाल सिडकोवासीय उपस्थित करीत आहे. सिडकोत लहान मोठ्या भांडणात थेट हत्यारे काढले जात असून ही हत्यारे येतात कुठून या बाबीचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविणे गरजेचे बनले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

"सिडकोतील शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालय बाहेरील गेटवरदेखील सीसीटीव्ही बसवले पाहिजे. सिडकोत विविध टोळ्या तयार होत असून यावर अंकुश नाही. टोळक्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे."- रत्नमाला राणे, माजी नगरसेविका

"अंबड पोलिस ठाण्यात वाढती गुन्हेगारी मला काही दिसत नाही. सर्व गुन्हे पूर्णत्वास आणले आहेत. तर गुन्ह्यांमधील संशयित सर्व अटक झालेले आहे. अनेकांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे." - सोहिल शेख, सहाय्यक पोलिस आयुक्त

"माझ्यावर झालेल्या हल्ल्यात अजूनही संशयित का, पकडला गेला नाही. रस्त्यावर गावगुंड कोयते घेऊन फिरत आहेत. बाकी पोलिस ठाण्यात असे प्रकार घडत नाही. अंबड हद्दीत सुरक्षित भागा सांगा जेथे लोक राहण्यास जातील. पोलिसांचा वचक नावाचा प्रकारच शिल्लक नाही."
- प्रशांत जाधव, महानगरप्रमुख युवक, आरपीआय आठवले गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT