Suspect Arrested esakal
नाशिक

Cidco Crime Case: सोशल मिडीयावरील वादातून सिडकोत युवकाचा खून; 8 विधीसंघर्षित बालकांसह 11 जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Cidco Crime Case : सोशल मीडियावर लाईव्ह असताना शिवीगाळ केल्याच्या रागातून सिडकोच्या सावतानगर भागात झालेल्या वादात परशुराम बाळासाहेब नजान (वय २४) या तरुणाचा मंगळवारी (ता. २५) रात्री खून झाला.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी आठ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. (Cidco murder case youth killed dispute on social media 11 people detained including 8 children involved in legal conflict nashik crime news)

या प्रकरणातील संशयित गिल्या उर्फ वैभव शिर्के हा इंन्स्टाग्रामवर लाईव्ह करत असताना एका अल्पवयीन मुलाने त्यास सोशल मीडियावरच शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने शिर्के याने सावतानगरच्या हॉटेल प्रत्यांश येथे जेवण करत असलेल्या संबंधित मुलाला गाठून त्यास जाब विचारत वाद घातला व चापटीने मारले.

या अल्पवयीन मुलासोबत असलेल्या परशुराम नजान याने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला व गिल्या शिर्के यास समजूत काढून परत पाठवले. परंतु, त्याच दरम्यान संबंधीत अल्पवयीन मुलाने गिल्यासोबत आलेल्या एका अन्य मुलाच्या पाठीवर कोयता मारला.

साथीदाराच्या पाठीवर कोयता मारल्याचा राग आल्याने गिल्या हा काही वेळाने पुन्हा साथीदारांसह हॉटेल परिसरात आला. त्यावेळी त्यांच्या हातात दगड, पेवर ब्लॉक असल्याचे पाहून अल्पवयीन मुलांनी तेथून पळ काढला.

पण, या भांडणाशी कोणताही संबंध नसलेला परशुराम हा तेथेच थांबला. त्यात, रागाच्या भरात आलेल्या अकरा जणांच्या टोळक्याने कुठलाही विचार न करता परशुरामवर हल्ला चढवला. यामध्ये परशुरामच्या डोक्यात पेवर ब्लॉक लागल्याने अन्य मित्रांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परंतु, जास्त रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात येताच त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

दरम्यान, या प्रकारानंतर अंबड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत काही तासांतच आठ विधी संघर्षित बालकांसह संशयित ओमकार दिलीप बागुल (वय १८, रा. विराट अपार्टमेंट, कामटवाडा), वैभव उर्फ गील्या गजानन शिर्के (वय २२) व अमोल बापू पाटील (वय २३, दोघेही रा. गोपालकृष्ण चौक, कामटवाडा) यांना पहाटे साडेपाचच्या सुमारास अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अंबड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, किशोर कोल्हे, संदीप पवार, उत्तम सोनवणे, किरण शेवाळे, सुनील बिडकर, नाईद शेख तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT