पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : भरदिवसा सिनेस्टाईलने पाठलाग करून मारहाण आणि लुटमार करून चोरट्यांनी पिंपळगांव पोलिसांना आव्हान दिले आहे. बँकेतून काढलेली दहा लाख रूपयांची रोख रक्कम शेतकऱ्यांना वाटपासाठी घेऊन जात असतांना टोमॅटो आडतदारांच्या कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून चोरट्यांनी दहा लाख रूपये लुटले. लुटमारीने पिंपळगांव बाजार समितीतील आडतदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरट्यांनी पाच घरफोड्यांमध्ये हात मारल्यानंतर धाडस वाढल्याने रस्त्यावर लुटमार केली आहे.
पिंपळगांव बाजार समितीतील समृद्धी फ्रुट आडतचे सन्मान गायकवाड यांनी रोखपाल संजय कापसे यांना महामार्गावरील एचडीएफसी बॅकेतुन धनादेश वटवुन दहा लाख रूपयांची रोकड आणण्यास दुपारी एक वाजता दुचाकीवर पाठविले. दीड वाजेच्या सुमारास बँकेतुन बाहेर निघाले. दुचाकीवरून ते जोपुळ रस्त्याने बाजार समितीकडे जात असतांना दुचाकीवर असलेल्या दोघांनी कापसेंच्या गाडीला भिमाशंकर स्कुल जवळ हुलकावणी दिली. चोरट्यांचा डाव लक्षात येताच कापसे यांनी शिताफीने दुचाकीचा वेग वाढविला.
चोरट्यांनी सिनेस्टाईलने कापसे यांचा पाठलाग केला. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हा थरार सुरू होता. दुपारची वेळ असल्याने रस्ताही सामसुम होता. चोरट्यांनी शंकर मंदिराच्या पुढे कापसेंना ओहरटेक करून गाडीला आडवे झाले. पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरटे व कापसे यांच्यात जोरदार झटापट सुरू झाली. चोरांतील एकाने कापसे यांच्यावर लाकडी दांडयाने प्रहार केला. त्यात कापसे यांच्या हाताचे हाड मोडुन ते गंभीर जखमी होऊन लगतच्या नालीत कोसळले. चोरट्यांनी दहा लाख रूपयांनी भरलेली बॅग घेऊन धुम ठोकली.
धास्तावले व्यापारी
कापसे यांच्यावर पाळत ठेवुन चोरट्यांनी ही लुटमार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही कॅमेरात दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांचे फुटेज पोलिसांना मिळुन आले आहे. दरम्यान, शहरातील घरफोड्यांच्या सत्रानंतर चोरट्यांची हिम्मत वाढल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांना लक्ष केले आहे. त्यामुळे दररोज करोडो रूपयांची ने आण असणारा जोपुळ रस्ता सुरक्षित राहीला नसल्याने व्यापारी धास्तावले आहे. पिपळगांव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखुन अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी तपासाची सुत्र हाती घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.