Garbage littered in the area. esakal
नाशिक

Nashik News : महापालिकेच्या स्वच्छतेवर नागरिकांचा संताप; सुविधांची वाणवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गाव खेड्यातून शहरालगत वसलेल्या अनेक वसाहती आहेत. शहरातील मोतीबाग नाका, सटाणा नाका व सोयगाव परिसराला लागून असलेल्या कलेक्टर पट्टा हा मोठा भाग आहे.

या परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्ता, गटारीसह अनेक समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या स्वच्छतेसह नागरी सुविधांच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Citizens anger over cleanliness of Municipal Corporation at malegaon Variety of facilities Nashik News)

प्रभाग रचना पद्धतीचा फटका बसल्याचे कारण खासगीत अनेक नागरिक बोलून दाखवतात. या भागातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक सुनील गायकवाड, मदन गायकवाड सातत्याने पाठपुरावा करतात.

मात्र प्रभागाचा वाढलेला विस्तार व नागरिकांच्या समस्या याकडे महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. सटाणा नाका, कलेक्टर पट्ट्यात देखील मुख्य रस्ते-कॉलनी अंतर्गत रस्ते, मुख्य भूमीगत गटार-कॉलनी अंतर्गत गटार, कचरा निर्मूलन या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.

काही भागात रस्ते बनले तर पुन्हा भूमीगत गटारांसाठी खोदण्यात आले. काही भागात बनलेल्या सिमेंट रस्त्यांचीच दैना झाली आहे. काही भागात कॉलनी अंतर्गत कमी खोलीचे उघडे गटार करण्यात आले, त्यामुळे पावसाळ्यात सांड पाण्यासह पावसाचे पाणी रस्त्यावर येत असून नागरी आरोग्य धोक्यात येत आहे.

सटाणा नाका ते रामलीला मैदान परिसरातील मुख्य व कायम वर्दळीचा असून या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे. परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता बनवण्याची मागणी करत आहेत तर नगरसेवक रस्ता मंजूर झाला आहे, आता प्रशासक राज आहे असे विविध कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत.

सटाणा नाका ते नाकोडा पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण झालेले असून तो देखील खराब झाला आहे. तर नाकोडा ते शिवरतन कॉलनीपर्यंत डांबरी रस्ता अस्तित्वात होता पण वर्षांपूर्वी भूमीगत गटारासाठी खोदण्यात आला तो तसाच सोडून देण्यात आल्याने रस्ता बिकटच झाला आहे. पावसाळ्यात छोटे- मोठे अपघात होतात. तसेच, अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी देखील कमी होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कचरा निर्मूलन होत नसल्याची ओरड

कचरा निर्मूलन नावालाच असल्याचे निदर्शनास येत असून रस्त्याच्या बाजूला व मोकळ्या प्लॉटवर परिसरातील नागरिक कचरा टाकतात याचे पुरावे पडलेले आहेत. घंटागाडी दररोज येत नाही, साफसफाई करणारे कर्मचारी देखील येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण शहरात घंटा गाडी, कचरा निर्मूलन होत नसल्याची ओरड आहेच. शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पडून आहे.

या आहेत प्रमुख समस्या-

-नाकोडा ते रामलीला मैदान रस्त्याची दयनीय अवस्था.

-अतिक्रमणामुळे रस्ता रुंदी कमी होत असल्याची तक्रार.

-नगरसेवकांनी रस्ते मंजूर केले आहे, आता प्रशासक.

-भूमीगत गटारासाठी खोदलेले रस्ते पुन्हा बनवले नाहीत.

-मुख्य भूमीगत गटारीस कॉलनीतील उप गटार जोडल्या जात नाहीत.

-घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे प्लॉट, रस्त्याच्या कडेला कचरा

-बोरसे नगरात गटारीच नाहीत, दरवर्षी शोषखड्डे भरतात.

-सांडपाणी रस्त्यावर.

-डासांचा वाढता प्रादूर्भाव, रोगराईला आमंत्रण.

"कलेक्टर पट्टा भागातील काही कॉलन्यांमध्ये कचऱ्याची समस्या कायम असल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागासह घंटागाडी नियमित करावी. गटारीच्या कामासह रस्ते दुरुस्ती करण्यात यावी. घरपट्टी, पाणीपट्टी बाबतीत महापालिका सक्ती करते. सुविधांच्या बाबतीत गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करावी."

- पवन वारुळे, नागरिक, सिद्धेश्वर कॉलनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT