news published in sakal newspaper esakal
नाशिक

Nashik News : टॅंकर मंजूर, पण डिझेलसाठी निधीच नाही! मंजूर टॅंकरची केविलवाणी स्थिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाकडून टॅंकर मंजूर होऊनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे हैराण ग्रामस्थांना प्रशासनाची अनास्था म्हणावी की, नियोजन शून्यता, मात्र आवळखेड ग्रामपंचायत हद्दीतील अनेक वाड्यावस्त्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. (Citizens are facing water shortage despite approval of tankers by government nashik news)

‘सकाळ’ने प्रशासकीय पातळीवर लक्ष वेधण्यासाठी ‘धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार तातडीने ग्रामपंचायतीने पाण्यासाठी शासन दरबारी प्रस्थाव पाठवून पाठपुराव्यानंतर टॅंकर मंजूर झाला, मात्र त्या शासकीय टॅंकरमध्ये डिझेल टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील पहिला मंजूर टॅंकर पंचवीस दिवसांपासून जागच्या जागी उभा असल्याचे चित्र आहे.

आवळखेड ग्रामपंचायत व हद्दीतील लहानमोठ्या वाड्या आहेत. गावात असलेले पशुधन, लग्नकार्य यांसह विविध कामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकुसाला असलेल्या विहिरीवरून कसेबसे पिण्याच्या पाण्याची सोय होत असली तरी त्यासाठी ग्रामस्थांना दीड ते दोन किलोमीटरवरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पशुधनाला पाण्यासाठी थेट त्रिंगलवाडी धरणावर पाच किलोमीटर डोंगर पार करून न्यावे लागत आहे. महिला, पुरुष आदिवासींची होणारी हेळसांड पाहून प्रशासनाकडून वेळत खासगी टॅंकर अथवा व्यवस्था न केल्यास पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

"पिण्याचे पाणी आज उद्या येईल या आशेने आम्ही वाट पाहत आहे. मंजूर टॅंकर अजूनही आलेला नाही. पंचवीस दिवसांपासून वाट पहातोय, दोन दिवसांत टॅंकर न आल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करू." - नामदेव कामडी, ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT