पंचवटी (जि. नाशिक) : औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुली मृत्यूचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी तत्काळ हम्प बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मिर्ची हॉटेल चौफुलीवर भीषण अपघात झाले आहेत. यात नुकताच एका वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या बसला अपघात झाला होता. फॉर्च्युनर व ट्रक यांच्यात अपघात झाला होता. या ठिकाणी अपघातात एक जण जागीच ठार झाला होता. यापूर्वी मनपा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेत कारवाई केली असती, तर खासगी बसचा भीषण अपघात टळला असता, अशी चर्चा सर्व सामान्यांमध्ये सुरू होती. (Citizens demand of build Hump on Mirchi Hotel Chaufuli Nashik Bus fire accident News)
घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. उपाययोजना व संबधित दोषींवर कारवाईचे आदेश दिले. मनपा आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत गतिरोधक व पाहणी करून अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मनपा आयुक्त चंद्रकांत पुंलकुंडलवार काय कारवाई करता याकडे सर्व सामान्याचे लक्ष लागून आहे.
तारवालानगर सिग्नल ते पेठ रोड सिग्नलमार्गे मखमलाबाद रोडपर्यंत नवीन मार्केट यार्डला लागून असलेल्या मोठा रिंग रोडवर कायम अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी डिव्हायडरचे नियोजन करीत माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सिग्नलवर हम्प बसविले. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. याचप्रमाणे मिर्ची हॉटेल चौफुलीवर हम्प बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी २० फेब्रुवारी २०२० ला नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मनपा आयुक्तांना मेरी रासबिहारी लिंक रोड, तारवालानगर अमृतधाम लिंक रोड, के. के. वाघ ते धात्रक फाटा, कळसकरनगर त्रिकोणी बंगला मार्ग, कमलनगर हिरावाडी नवीन आडगाव नाका, मीनाताई ठाकरे स्टेडियम मार्ग, बाप्पा सीताराम मार्ग, औरंगाबाद नाका ते नांदूर नाका, जोशी कॉलनी गुंजाळबाबानगर- अमृत धाम लिंक रोड आदी भागात गतिरोधक बसविण्यासाठी मागणी केली होती. यावर वेळीच योग्य ती कार्यवाही झाली असती, तर अपघात टळला असता, असे यातून दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.